Anandraj Ambedkar Controversial statement Ajit Pawar sarkarnama
महाराष्ट्र

Anandraj Ambedkar Controversy : अजित पवारांवर बोलताना आनंदराज आंबेडकरांची जीभ घसरली; राष्ट्रवादी आक्रमक, माफी मागा अन्यथा...

Ajit Pawar Suraj Chavan NCP : आनंदरराज आंबेडकर यांनी सारवारव करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले. अजित पवार यांनी याआधी पाण्याच्या संदर्भात केलेल्या विधानाचा उपरोधिकपणे उल्लेख केला.

Roshan More

Suraj Chavan NCP : आनंदराज आंबेडकर यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे. रिपब्लिकन सेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी अजित पवारांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणाले की, ‘आपले राज्यकर्ते म्हणतात की पाणी आडवा, पाणी जिरवा. जिथे पाऊसच पडत नाही, तिथे तलाव भरण्यासाठी अजितदादांना आणायचं का?'

भाषणानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी यावर सावरासावर केली. ते म्हणाले की, अजित पवार यांनी याआधी पाण्याच्या संदर्भात केलेल्या विधानाचा उपरोधिकपणे उल्लेख केला. दरम्यान, आंबेडकर यांच्या वक्तव्यानंतर त्यांचा निषेध करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आनंदराज आंबेडकर यांनी माफी मागावी, अशी भूमिका घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सूरज चव्हाण यांनी म्हटले आहे की, 'आनंदराज आंबेडकर यांनी स्व.अजित दादा पवार यांच्यावर केलेल्या विधानाचा जाहीर निषेध करतो. हयात नसलेल्या व्यक्तीवर बोलून त्यांनी अकलेची दिवाळखोरी दाखवलेली आहे.'

'फक्त आंबेडकर आडनाव असलं म्हणजे अक्कल असतेच असं नाही.स्व.अजित दादावर केलेल्या विधानाची त्यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा संविधानिक पद्धतीने त्यांना भेटतील तिथे विरोध करू.', असा इशारा देखील त्यांनी दिला.

आंबेडकर यांचे विधान चुकीचे

खासदार संजय राऊत यांनी आंबेडकरांच्या वक्तव्यावर बोलताना म्हटले की, आंबेडकरांचं विधान चुकीचं आहे. दिवंगत अजितदादाविषयी असं बोलू नये. सरकारने केलेले विधान देखील चुकीचेच आहे. पाऊसच पडलेला नाही तर पाणी कुठून आडवायचं, पाणी कुठून जिरवायचं. त्यापेक्षा या सरकारला जी घोषणा योग्य आहे, भ्रष्टाचारातला पैसा आडवा, पैसा जिरवा आणि घरी न्या. ही या सरकारची घोषणा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT