NCP News: दुष्काळाच्या संकटात होरपळलेल्या शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादीचे सर्व आमदार एकवटले; सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय

Maharashtra Drought : राज्यात सुमारे 62 हजार कोटींच्या शेतपिकांचं नुकसान झाले असून तब्बल 1.41 कोटी हेक्टरवरील पिके बाधित झाल्याचंही समोर आलं होतं. याचदरम्यान, आता दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Ncp Sunetra Pawar
Ncp Sunetra Pawar Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारनं सुरुवातीला 358 पैकी 304 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता.त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणखी 10 तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांच्या यादीत समावेश करण्यात आला. तसेच प्राथमिक अंदाजानुसार, राज्यात सुमारे 62 हजार कोटींच्या शेतपिकांचं नुकसान झाले असून तब्बल 1.41 कोटी हेक्टरवरील पिके बाधित झाल्याचंही समोर आलं होतं. याचदरम्यान, आता दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पहिल्या टप्प्यात 5000 रुपयांची अग्रीम मदत देण्यात आली होती. यानंतर सरकारकडून नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पात्र दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी लवकरच दुसऱ्या मदतीच्या हप्त्याची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. याचदरम्यान, राजकीय पक्षही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येत असल्याचं समोर येत आहे.

सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी त्यांचं एक महिन्याचं वेतन हे दुष्काळग्रस्तांना देण्याचं जाहीर केलं आहे. सुनेत्रा पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांच्या वतीने एक महिना वेतनाचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस हा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीचा हात पुढे करणारा पहिला पुढाकार घेतला.राष्ट्रवादीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार पक्षाच्या सर्व आमदारांनी एका महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम देण्याचा निर्णय जाहीर केला होता. मंगळवारी(ता.17 नोव्हेंबर) पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान आमदारांच्या वेतनाचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

Ncp Sunetra Pawar
Congress Shiv Sena News : शिवसेना आमदाराचा डाव काँग्रेस नेत्यानं उलटवला? श्रीकांत शिंदेंच्या उपस्थित झालेला पक्षप्रवेश दिशाभूल करणारा, दुर्राणींचा मोठा दावा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी शेतकरी बांधवांवर ओढवलेल्या संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना आवश्यक ती मदत मिळवून देणे, हीच  अजितदादांनी आपल्याला दिलेली खरी शिकवण असल्याचं म्हटलं आहे. तसेच त्यांच्या या विचारांचा वारसा पुढे नेत, शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी योगदान देणे, ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचंही नमूद केलं आहे.

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दुसऱ्या हप्त्यापोटी 2000 रुपये देण्याच्या हालचाली सरकारने सुरू केल्या आहेत. ही मदत डिसेंबर 2026 च्या पहिल्या आठवड्यापासून या निधीचे वितरण होणार असल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीत शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची अग्रीम मदत दिल्यानंतर शेतकऱ्यांना आणखी मदत देणार असल्याचंही स्पष्ट केलं होतं.

Ncp Sunetra Pawar
Jalgaon DCC Bank Election : जळगाव जिल्हा बँकेत महायुतीची बाजी! 12 उमेदवार बिनविरोध; शिवसेनेने मारली मोठी मुसंडी, भाजपलाही टाकलं मागे

मराठवाडा तसेच विदर्भासह विविध भागांमध्ये शेतकऱ्यांना दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. या दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे सरकारच्या मदतीकडे लागलेले आहेत. याचदरम्यान आता सरकारच्या मदत व पुनर्वसन विभागाकडून दुष्काळग्रस्त भागांतील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावपळ सुरू झाली आहे.

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होत आहे.याच पार्श्वभूमीवर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला किंवा सभागृहातील चर्चेदरम्यान या मदतीची घोषणा करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. पहिल्या टप्प्यातील 5000 आणि दुसऱ्या टप्प्यातील 2000 असे एकूण 7000 अग्रीम मदत प्राप्त मिळणार आहे.

मात्र, आता राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दुसरा हफ्ता म्हणून अतिरिक्त 2000 रुपये मदत देण्याचा कोणताही प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन नसल्याचं स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात पसरणाऱ्या बातम्या अफवा असून असा कोणताही निर्णय सरकार दरबारी झाला नसल्याचंही मंत्री भरणे यांनी म्हटलं आहे

आत्तापर्यंत राज्यातील दुष्काळी भागांमधील सुमारे 1 कोटी 10 लाख बाधित शेतकऱ्यांपैकी 1 कोटी शेतकऱ्यांना पहिला हप्ता मिळाल्याची माहिती आहे.आता याबरोबरच पुढील दुसरा हफ्ताही सरकारकडून पात्र शेतकऱ्यांना लवकर दिला जाण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.