Eknath Khadse, Anjali Damania Sarkarnama
महाराष्ट्र

Anjali Damania On Eknath Khadse : एकनाथ खडसे तुम्हाला देवाने धडा शिकवला, अंजली दमानियांनी 'ती' खंत देखील बोलून दाखवली

Anjali Damania Pankaj Khewalkar Arrested False FIR: कोंबडं कितीही झाकलं तरी अरवल्या शिवाय राहत नाही तसा या सर्व कुभांडाचा खोटेपणा उघडकीस येऊ लागला आहे, असे एकनाथ खडसे यांनी जावई पंकज खेवलकर अटक प्रकरणात म्हटले आहे.

Roshan More

Eknath Khadse Family Case: एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना रेव्ह पार्टी प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची कोठडी देखील सुनावली होती. दरम्यान, आपल्या जावयाला यात गोवले आहे, ट्रप लावून त्यांना अडकवण्यात आल्याचा आरोप खडसे यांनी केला.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील प्रांजल खेवलकर यांना अडकवण्यात येत असल्याचे म्हटले आहे. मात्र, त्यांनी खडसेंनी त्यांना त्रास दिला होता याची आठवण करून देत त्यांना सुनावले आहे.

दमानिया यांनी ट्विट करत म्हटले आहे की, 'श्री खडसेजी , हे अतिशय खालच्या पातळीचे राजकारण आहे ह्यात काहीच शंका नाही. तुमच्या सारख्या लोकांविरुद्ध लढून सुद्धा, मी जे खरं आहे तेच बोलते. खडसे तुम्ही स्वतः, मला आणि माझ्या कुटुंबाला, किती छळालं ते आठवा.'

'४ खोट्या FIR , ३२ डिफेमेशन केसेस, ट्रेनमधे माझा फ़ोन नंबर लावणे, दाऊदच्या नावाने मला धमकीचा फोन करवणे, लढा सोडून देण्याची धमकी देणे…. काय काय नाही केलेत. वाईट एवढच वाटतंय की रोहिणीला व तिच्या नवऱ्याला भोगावं लागलं', अशी खंत देखील दमानिया यांनी बोलून दाखवले तसेच आज तुम्हाला परमेश्वराने धडा शिकवला. खोट्या एफआयआरचा किती त्रास होतो ते आता कळेल तुम्हाला.', असे देखील म्हटले आहे.

खालच्या पातळीचे राजकारण

एकनाथ खडसे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मी पुण्यात मी मुलीच्या घरी जी पत्रकार परिषद घेतली त्यात काही लोक घुसले होते. ते पोलिस असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या कुटुंबाची अजूनही रेकी केली जात आहे.

माझ्या कुटुंबाविरोधात कुणाला आणखी एखादं कुभांड रचायचे आहे का ? असा प्रश्न मला पडतो आहे. माझ्या ३५-४० वर्षांच्या संसदीय कारकीर्देत मी इतक्या खालच्या पातळीचे राजकारण पाहिले नाही.कोंबडं कितीही झाकलं तरी अरवल्या शिवाय राहत नाही तसा या सर्व कुभांडाचा खोटेपणा उघडकीस येऊ लागला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT