Vijay Wadettiwar : वडेट्टीवारांचे शपथपत्र देण्यास नकार, जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यालाच खेचले कोर्टात

Vijay Wadettiwar Election Affidavit Controversy: काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी निवडणूक अर्जासोबत सादर केलेले शपथपत्र मागण्यात आले आहे. पण ते अद्याप न दिल्याने जिल्हाधिकाऱ्यांसह सहायक निवडणूक अधिकारी अडचणीत आले आहेत.
Vijay  Wadettiwar refuses to submit affidavit to election officer
Vijay Wadettiwar refuses to submit affidavit to election officerSarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी निवडणूक अर्जासोबत शपथपत्र सादर न केल्यामुळे त्यांच्यावर कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

  2. ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातील ही घटना असून विरोधी पक्षांच्या उमेदवारांनी ही याचिका दाखल केली आहे.

  3. यामुळे चंद्रपूर जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी यांनाही न्यायालयात हजर राहण्याचे आदेश मिळाले आहेत.

Nagpur Political News: चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातून जिंकून आलेले काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार सध्या चांगलेल चर्चेत आहेत. आता त्यांनी निवडणूक अर्जासोबत सादर केलेले शपथपत्रही चर्चेत आले आहे.

याच शपथपत्रावरून चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आणि सहायक निवडणूक अधिकारी अडचणीत आले असून त्यांना थेट न्यायालयात खेचण्यात आले आहे. परिवर्तन महाशक्ती संयुक्त आघाडी, प्रहार जनशक्ती पक्ष, स्वाभिमानी पक्ष, स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार ॲड. नारायण जांभुळे यांनी ही याचिका दाखल केली आहे.

या प्रकरणात चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकारी आणि सहायक निवडणूक अधिकारी यांना याचिकेतून वगळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे, याचिकाकर्त्याने या मागणीला विरोध करत उच्च न्यायालयात याला उत्तरार्थ शपथपत्र सादर केले आहे.

ब्रह्मपुरी आणि चिमूर मतदार संघातील परिवर्तन महाशक्ती संयुक्त आघाडी, प्रहार जनशक्ती पक्ष, स्वाभिमानी पक्ष, स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार ॲड. नारायण जांभुळे यांनी ही याचिका दाखल केली आहे.

Vijay  Wadettiwar refuses to submit affidavit to election officer
Vijay Wadettiwar on BJP Mahayuti : महामंडळ वाटप, हा सरकराचा नवा 'लॉलीपॉप'; विजय वडेट्टीवारांचा भाजप महायुतीला टोला

या प्रकरणावर न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्या समक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्याने शपथपत्र दाखल केले. चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक अधिकारी आणि सहायक निवडणूक अधिकारी यांच्यावतीने अर्ज दाखल करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही, असा दावा अर्जात केला आहे.

तसेच, या अधिकाऱ्यांची नियुक्ती केंद्रीय निवडणूक आयोगाच्या 3 ऑक्टोबर 2024 आणि 21 ऑक्टोबर 2024 च्या आदेशांनुसार झाली होती आणि जिल्हाधिकाऱ्यांचा त्यांच्या निवडणूक कर्तव्यांवर कोणताही नियंत्रण नाही.

त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा अर्ज फेटाळावा, अशी मागणी त्यांनी केली. याचिकाकर्त्याने हेही नमूद केले की, त्यांनी 30 ऑक्टोबर 2024 रोजी निवडणूक अधिकाऱ्यांकडे वडेट्टीवार यांच्या शपथपत्राच्या आणि फॉर्मच्या प्रमाणित प्रती मागितल्या होत्या. परंतु, त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

त्यानंतर, 3 आणि 6 नोव्हेंबर 2024 रोजी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना, मुंबई यांना ई-मेलद्वारे वडेट्टीवार यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली होती. परंतु त्यावरही कोणतीही कारवाई झाली नाही. याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा दाखला देत सांगितले की, त्यांची याचिका लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 च्या कलम 80, 81 आणि 100 अंतर्गत दाखल करण्यात आली आहे. ना की कलम 82 आणि 86 (4) अंतर्गत.

त्यामुळे निवडणूक अधिकारी आणि सहायक निवडणूक अधिकारी यांना याचिकेतून वगळण्याची मागणी लागू होत नाही. याचिकाकर्ता ॲड. नारायण जांभुळे यांनी स्वतः बाजू मांडली. निवडणूक आयोगातर्फे ॲड. नीरजा चौबे आणि विजय वडेट्टीवार यांच्या वतीने ॲड. निखिल कीर्तने यांनी बाजू मांडली.

Vijay  Wadettiwar refuses to submit affidavit to election officer
Vijay Wadettiwar On Girish Mahajan : बाबू धीरज रखो... वडेट्टीवारांचा गिरीश महाजनांना सूचक इशारा

FAQs :

1. विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात कोर्टात याचिका का दाखल झाली?
त्यांनी निवडणूक अर्जासोबत शपथपत्र सादर न केल्यामुळे, निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोप करत ही याचिका दाखल झाली आहे.

2. ही याचिका कोणत्या पक्षांनी दाखल केली आहे?
परिवर्तन महाशक्ती संयुक्त आघाडी, प्रहार जनशक्ती पक्ष, स्वाभिमानी पक्ष, आणि स्वतंत्र भारत पक्ष यांच्याकडून ॲड. नारायण जांभुळे यांनी ही याचिका दाखल केली आहे.

3. या प्रकरणात जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी कोर्टात का बोलावले गेले आहेत?
कारण त्यांनी निवडणूक अर्जाच्या प्रक्रियेमध्ये संबंधित शपथपत्राची पूर्तता केली नाही, असा आरोप करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com