कोकाटेंच्या अवस्थेवर शेलक्या भाषेत फडणवीसांच्या जवळच्या नेत्याची टीका; म्हणाला, 'तोंड गढूळ तर ***'

Sadabhau Khot On Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे सुरुवातीपासूनच वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहिले आहेत. अशातच त्यांचा अधिवेशनात रमी खेळताना व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यांचा राजीनामा मागितला जात आहे.
Manikrao Kokate
Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त विधानांमुळे विरोधकांनी राजीनाम्याची मागणी केली आहे.

  2. भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी कोकाटे यांच्यावर टीका करत ते झाडाच्या पारावर बसल्यासारखे बोलतात, असे वक्तव्य केले.

  3. या वादामुळे कोकाटे यांच्यावर राजकीय दबाव वाढला असून त्यांच्या मंत्रिपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Pune News : महायुतीच्या नव्या सरकारमध्ये कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे सुरुवातीपासूनच आपल्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत राहिले आहेत. सध्या माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या असून विरोधकांनी एका व्हिडिओच्या आधारे ते सभागृहात रमी खेळत असल्याचा आरोप केला आहे. यानंतर सातत्याने त्यांच्या राजीनामाची मागणी होत आहे. अशातच भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी माणिकराव कोकाटे यांच्या सध्याच्या स्थितीबाबत भाष्य करताना खोचक टोला लगावला आहे. (Maanikrao Kokate facing criticism and resignation demands after BJP MLA Sadabhau Khot’s sarcastic remarks)

ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले, मी जे कृषी मंत्री जवळून बघितले आहेत. यामध्ये माणिकराव कोकाटे यांच्याबाबत बोलायचं झालं तर आपल्या गाव गाड्यांमध्ये एक म्हण आहे. 'तोंड गढूळ तर ढुंगण मार खातं', अशीच अवस्था कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची झाली आहे.

Manikrao Kokate
Sadabhau Khot On Gulabrao Patil : मंत्री गुलाबरावांची भाजप 'विकेट' घेण्याच्या तयारीत; हर्षलच्या आत्महत्याप्रकरणात सदाभाऊंकडून राजीनाम्याची मागणी

माणिकराव कोकाटे हा साधारण माणूस आहे. कृषी मंत्री पदावर बसल्यानंतर ते गाव गाड्याच्या पारावर बसल्यासारखं बोलू लागले आहेत. मात्र मंत्रीपदावर बसल्यानंतर त्या गोष्टी बोलायच्या नसतात. तोंडावर बोट ठेवायचं असतं. आपलं मौन अनेक गोष्टींना उत्तर देत असतं. पण हे त्या बिचार्‍या माणिकरावांना लक्षात आलेलं नाही, असाही टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे.

सदाभाऊ खोत पुढे म्हणाले, माणिकराव कोकाटे हे अनेक वर्ष आमदार राहिलेले आहेत. मात्र ते त्या पदापर्यंत पोहोचू शकले नाही आणि आता पहिल्यांदा पदावर पोहोचल्यानंतर त्यांना वाटत आहे की पारा वरल्या गप्पा सारखाच बोलायचं आहे. म्हणून ते बोलायला गेले मात्र ते फसले. माणिकराव कोकाटे हे बोलण्यात फसले आहेत. मात्र त्याने काय मोठं कोणाचं नुकसान झालेलं नाही. परंतू आता सगळेच जण त्यांच्या मागे लागले आहेत. ज्यांनी बँका खाल्ल्या, साखर कारखाने बुडवले, सूत गिरण्या खाऊन टाकल्या, किलोमीटरने जमिनी घेतल्या त्यांच्यावर सध्या कोणीही बोलायला तयार नाही.

सरकारची तिजोरी दिवसाढवळ्या सत्तेच्या माध्यमातून ज्यांनी लुटली. त्यांच्या वर आम्ही काही बोलायला तयार नाही. 50 वर्ष ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्यावर कोणीही बोलायला तयार नाही. मात्र माणिकराव कोकाट्यांच्या मागे सगळेच राजीनामा दे म्हणून मागे लागले आहेत, असं सदाभाऊ खोत म्हणाले.

Manikrao Kokate
'आम्ही फाटकेच, पण तुमची फाडायला लागलो की तोंड दाखवायला जागा राहणार नाही', Sadabhau Khot यांची टीका

FAQs :

1. माणिकराव कोकाटे यांच्या विधानांवरून वाद का पेटला आहे?
त्यांनी केलेली भाषणे आणि विधानं अतिशय साध्या व अनौपचारिक पद्धतीची असल्याने विरोधकांनी ती गांभीर्याने घेत राजीनाम्याची मागणी केली आहे.

2. सदाभाऊ खोत यांनी नेमकी काय टीका केली आहे?
ते म्हणाले, “कोकाटे हे कृषिमंत्री असूनही झाडाच्या पारावर बसल्यासारखे बोलत आहेत.”

3. कोकाटे यांच्या विरोधात पुढे काय होऊ शकते?
जर विरोधकांचा दबाव वाढत राहिला तर मंत्रिपदाच्या संदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com