Mumbai News : राज्यात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या घडामोडी होताना दिसत आहेत. काहीच दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी मसने अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. तर ही भेट युतीच्या संदर्भात झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या चर्चा थांबतात न थांबतात तोच राज ठाकरेंनी एका मुलाखतीत मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही पक्ष मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येऊ शकतात असे वक्तव्य करत युतीचे संकेत दिले. यामुळे राज्याचे राजकारण आता ढवळून निघाले आहे. पण आता यावरून भाजपमधून तिखट प्रतिक्रिया आली असून बाजप नेते आशिष शेलार यांनी यावर भाष्य केलं आहे.
मनसे राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्याशी युती करण्यास कोणतीही अडचण नसल्याचे म्हटलं होतं. तर युतीवर सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तर ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाराष्ट्राला आनंद होईल अशा प्रतिक्रिया येत आहेत. अशावेळी आशिष शेलार यांनी राज ठाकरेंशी असलेले वैयक्तकिक संबंध संपल्याचं म्हणत यावर प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे भाजपने राज यांच्याशी संबंध तोडण्यास सुरूवात झाल्याचे आता म्हटलं जात आहे.
यावेळी आशिष शेलार म्हणाले की, वैयक्तिक वगैरे आत्तापर्यंतचे जे शब्द होते ते पुरे झाले. आता माझ्यासाठी हा विषय संपला असून ते माझे वैयक्तिक मित्र होते. पण आता ते ही संबंध संपले आहेत. राहिला राजकीय भाष्याचा विषय तर मनसे आणि उबाठा हे दोन राजकीय पक्ष असून ते काय व कसं करायचं त्यांचा प्रश्न असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत, आमच्यात कोणत्याही गोष्टीसाठी वाद किंवा भांडणं ही किरकोळ आहेत. पण महाराष्ट्र खूप मोठा आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी असे वाद अत्यंत क्षुल्लक आहे. यामुळे महाराष्ट्रासाठी पुन्हा एकत्र येणं, राहणं माझ्यासाठी कठीण गोष्ट नाही. पण ही फक्त माझी एकट्याची इच्छा असून चालत नाही. मी त्यावेळीही उद्धव बरोबर काम केलं आहे. यामुळे काही अडचण नाही. यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील या टाळीला प्रतिसाद दिला. ज्यामुळे राज्यभर आता चर्चांना जोर वाढला आहे.
महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन मी आजही करत असून अगदी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी देखील तयार आहे. याच्याआधीही लोकसभेच्या वेळी महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पळवले जात असताना विरोध केला असता तर आज इकडे आणि केंद्रात देखील आपलं सरकारं असतं. महाराष्ट्राच्या हिताचं विचार करणारं सरकार असतं. पण तेव्हा त्यांनी विरोध केला नाही. मात्र आता महाराष्ट्राच्या हितासाठी त्यांना घरी घेणार नाही, मी जाणार नाही असे ठरवत असाल तर मी ही तयार आहे. त्यासाठी आधी शपथ घ्यायची शिवरायांपुढे असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.