Ashok Chavan News Sarkarnama
महाराष्ट्र

Ashok Chavan News : आरोप होताच राजीनामा घेण्याची पद्धत काँग्रेसमध्ये, मी त्याचा बळी ठरलो होतो!

Ashok Chavan expresses regret over his resignation from Congress when allegations were leveled against him : विशेष म्हणजे बीड किंवा अन्य प्रकरणाशी याचा कोणीही संबंध जोडू नये, मी व्यक्त कलेले हे मत माझे व्यक्तीगत आहे. काँग्रेसमध्ये या परिस्थितीतून मी गेलो आहे. मलाही चुकीच्या पद्धतीने राजीनामा द्यावा लागला होता, अशी खंत चव्हाण यांनी व्यक्त केली.

Jagdish Pansare

BJP News : एखाद्या व्यक्तीवर बिनबुडाचे, खोटे आरोप करून त्याचे राजकीय जीवन उद्धवस्त करण्याची अनेक उदाहरणं राज्याच्या अन् देशाच्या राजकारणात पहायला मिळतात. काँग्रेसमध्ये एखाद्या व्यक्तीवर आरोप झाला की त्याची शहानिशा न करता राजीनामा घेतला जात होता. आरोप सिद्ध होण्यापुर्वी एखाद्याला अशी शिक्षा देणे उचित नाही. मी स्वतः काँग्रेसमध्ये असताना याचा बळी ठरलो होतो, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी राज्यातील सद्य परिस्थिती आणि राजकारणात झालेल्या आरोपांवरून केली जाणारी राजीनाम्याची मागणी यावर भाष्य केले.

विशेष म्हणजे बीड किंवा अन्य प्रकरणाशी याचा कोणीही संबंध जोडू नये, मी व्यक्त कलेले हे मत माझे व्यक्तीगत आहे. काँग्रेसमध्ये या परिस्थितीतून मी गेलो आहे. मलाही चुकीच्या पद्धतीने राजीनामा द्यावा लागला होता, अशी खंत चव्हाण (Ashok Chavan) यांनी व्यक्त केली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात वाल्मीक कराडला अटक झाल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव यात घेतले जाऊ लागले. कृषी मंत्री असतांना त्यांच्या खात्यात झालेला उपकरण खरेदी, पीकविमा यात मोठा भ्रष्टाचार झाल्याच आरोप केला जात आहे.

परळी येथील खंडणी आणि सरपंच संतोष देशमुख प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींचा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याशी संबंध असल्याच्या आरोपावरून या प्रकरणांची संपूर्ण चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावरून हटवावे, यासाठी विरोधकांनी रान पेटवले आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा या प्रकरणाशी कसलाही संबंध नाही, त्यामुळे राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही अशी भूमिका घेतली आहे.

या संदर्भात भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांना माध्यमांनी बोलते केले, तेव्हा त्यांनी एखाद्यावर आरोप झाले म्हणजे तो दोषी असे ठरवून त्याला शिक्षा देणे किंवा त्याला पदाचा राजीनामा द्यायला सांगणे योग्य नाही. अशा चुकीच्या पद्धतीने काँग्रेसमध्ये कारवाई केली जात होती. मी स्वतः या सगळ्या गोष्टीतून गेलो आहे, मला केवळ आरोप झाले म्हणून मला बाजूला करण्यात आले होते, असा आरोप चव्हाण यांनी केला. राजकारणात एखाद्याला खोटे आरोप करून बदनाम करणे ही अगदी सहज, सोपी गोष्ट झाली आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव या प्रकरणात समोर आले होते. त्यांच्यावर आरोप होताच काँग्रेस हायकमांडने त्यांचा राजीनामा घेतला होता. या निमित्ताने अशोक चव्हाण यांनी पुन्हा एकदा याची आठवण काढत काँग्रेसने आपल्यावर केवळ आरोप झाले म्हणून राजीनामा घेत कसा अन्याय केला होता? हे सांगण्याचा प्रयत्न केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT