Political News : महाविकास आघाडीत संजय राऊत यांनी शिवसेना 23 जागांवर लढणार असे सांगितले तर, प्रकाश आंबेडकर यांनी 12 जागांची मागणी केली आहे. प्रत्येक जण महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फाॅर्म्युला ठरल्याचे सांगत आहे. मात्र, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी जागा वाटपा बाबत मोठी अपडेट देत त्यांची अडचण सांगितली आहे.
जागा वाटपाचा फाॅर्म्युला ठरलेला नाही. जिंकण्याची क्षमता ज्याची त्याला ती जागा, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे. काँग्रेसच्या बाबतीत पक्षश्रेष्ठ निर्णय घेतील. महाराष्ट्रातील परिस्थिती आपण त्यांना सांगितल्याचे चव्हाण म्हणाले. त्यामुळे जोपर्यंत काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून निर्णय होत नाही तोपर्यंत जागा वाटपाचा निर्णय होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
काँग्रेस किती जागांवर लढणार हे स्पष्ट झालेले नाही. नुकतीच काँग्रेसकडून केंद्रीय नेत्यांना महाराष्ट्रात २७ जागांवर लढण्याचा प्रस्ताव देण्यात आली असल्याची चर्चा आहे. त्यावर दिल्लीच्या केंद्रीय समितीसोबत लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली. समितीने महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती जाणून घेतली. तसेच कोणत्या जागा सोयीच्या आहेत याची माहिती घेतल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.
आघाडीतील इतर पक्षांसोबत चर्चा सुरू आहे. त्यांचे मत विचारात घेऊन निर्णय घेतला जाईल, असे संकेत चव्हाण यांनी दिले. तसेच महाराष्ट्रात लोकसभेच्या केवळ 48 जागा आहेत. मात्र, महाविकास आघाडीतील काही नेत्यांची जागांची मागणी पाहता या जागा 48 पेक्षा जास्त होत असल्याचा टोला चव्हाण यांनी लगावला.
आपल्या राज्यात एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी १६ विमाने आहेत. तर, आपल्या राज्यातून गुजरातला जाण्यासाठी ५४ विमाने असल्याचे टीका चव्हाण यांनी भाजपवर केली. तसेच जालना ते मुंबई अशी वंदे भारत रेल्वे सुरू झाली. मात्र, वंदे भारत ही गाडी नांदेड पासून का नाही? असा सवाल देखील त्यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.