Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीचं ठरलं! काँग्रेस 22 तर, शिवसेनेला 18 जागा?

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपावरून चर्चा, 'वंचित'ला दोन जागा?
Mahavikas Aghadi's Leader
Mahavikas Aghadi's LeaderSarkarnama
Published on
Updated on

Mumba: महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून एकमत होत नाही. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी लोकसभेच्या 23 जागांवर दावा सांगितला आहे. तर, काँग्रेस नेतेसुद्धा 27 जागांवर लढण्यास ठाम आहेत. जागा वाटपांसंदर्भात काँग्रेसने नेमलेल्या पाच सदस्यीय समितीने देखील काँग्रसने महाराष्ट्रातून 27 जागांवर निवडणूक लढायला हवी, असा प्रस्ताव केंद्रीय नेत्यांना दिलाय. त्यामुळे कोणाच्या वाट्याला किती जागा येणार याची चर्चा सुरू आहे.

Mahavikas Aghadi's Leader
Narendra Modi in Ayodhya : पंतप्रधान मोदी आज अयोध्या दौऱ्यावर; 1500 कोटींच्या प्रकल्पांची घोषणा...

लोकसभेसाठी काँग्रेसला 22, शिवसेनेला (ठाकरे गट) 18 तर, राष्ट्रवादीला सहा आणि वंचित बहुजन आघाडीसाठी दोन जागा असा फाॅर्म्युला मांडण्यात येतो आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून यावर चर्चा सुरू आहे. मात्र, राष्ट्रवादी आणि 'वंचित' येवढ्या कमी जागांवर लढण्यासाठी तयार नसल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

'वंचित'चा अजूनही महाविकास आघाडीत समावेश झाला नाही. 'वंचित'कडून पत्र लिहून राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, वंचित यांनी प्रत्येक 12 जागा लढवण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, हा प्रस्ताव काँग्रेस, शिवसेनेला मान्य होणार नाही. या पक्षांकडून 'वंचित'च्या प्रस्तावावर अधिकृत कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आली नसली तरी लोकसभेसाठी 20 पेक्षा जास्त जागांसाठी शिवसेना आणि काँग्रेस आग्रही आहेत.

जागा वाटपावरून काँग्रेस नेते संजय निरुपम आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात जुंपली आहे. ठाकरे गटाने 23 जागा लढल्यानंतर आम्ही कुठे लढणार, असा सवाल निरुपम यांनी केला होता. त्यावर संजय राऊत यांना संजय निरुपम कोण आहेत? काँग्रेसची दिल्लीतील हायकमांड निर्णय घेईल, असे सुनावले होते. तसेच पूर्वी जिंकलेल्या जागांवर विचार होणार नाही. त्या जागा जिंकलेला पक्षच लढेल, असे राऊत म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'वंचित'कडून 12 जागांचा दावा करण्यात येत असला तरी त्यांना अकोल्याची एक आणि आणखी दोन जागा देण्याबाबत काँग्रेसमध्ये चर्चा होत आहे. तर, शिवसेना देखील पूर्वी त्यांनी लढलेल्या 23 जागांसाठी आग्रही आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक लवकरच होणार आहे. या बैठकीत या सगळ्यावर तोडगा निघेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Mahavikas Aghadi's Leader
Amol Kolhe vs Ajit Pawar : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात येऊन कोल्हे गरजले; बारामतीत बरेच काही बोलले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com