Maharashtra politics reaction to Ashok Kharat case Sarkarnama
महाराष्ट्र

Ashok Kharat Controversy : मोठी बातमी! रुपाली चाकणकरांवर कारवाई होणार, प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितले, 'एक दोन दिवसांत...'

Praful Patel statement on Rupali Chakankar: अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्यावर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. प्रफुल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना याविषयी स्पष्ट संकेत दिले आहेत.

Roshan More

Praful Patel reaction to Ashok Kharat case: अशोक खरात प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. त्यातच मंत्री दत्तात्रय भरणे यांनी चाकणकरांची पाठराखण केली होती. मात्र, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी रुपाली चाकणकरांवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

ते म्हणाले, अशोक खरात याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. तसेच त्याच्या सोबत सोबत या कामात जे राहिले असेल तर निश्चित त्यांची नावे चौकशीत समोर येतील त्यांच्यावरही तातडीने आणि सक्तीने कारवाई केली गेली पाहिजे.

'काही राजकीय नेत्यांचा नाव त्यांच्याशी जोडलं गेलं आहे. नक्की आम्ही राष्ट्रवादी म्हणून योग्य कारवाई करणार आणि तुम्हाला या एक दोन दिवसात ते दिसले.', असे म्हणत पटेल यांनी चाकणकरांवर कारवाईचे संकेत दिले आहेत.

चाकणकरांची नार्को टेस्ट करा

रुपाली चाकणकर यांना अशोक खरातच्या कारनाम्यांविषयी माहिती होती. मात्र, त्यांनी त्यांना पाठीशी घातले. ज्या महिलेने तक्रार केली तिच्यावर दबाव आणला. चाकणकरांनी तातडीने राजीनामा द्यावा तसेच त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT