Captain Ashok Kharat Sarkarnama
महाराष्ट्र

Ashok Kharat case update : अशोक खरातप्रकरणात झाली मातब्बर वकिलाची एन्ट्री; अनेक खटल्यात दाखवलाय कायद्याचा हिसका...

Ajay Misar appointment prosecutor : राज्य सरकारने याप्रकरणी आता विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ अजय मिसर यांची नियुक्ती केली आहे.

Rajanand More

Maharashtra Government news : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचा पाय आणखी खोलात गेला आहे. कालपर्यंत त्याच्यावर सहा गुन्हे दाखल झाले होते. त्याच्याविरोधात दररोज तक्रारींमध्ये वाढ होत असून विशेष तपास पथकाकडून कसून चौकशी केली जात आहे. त्यातच आता याप्रकरणी राज्य सरकारने मोठा निर्णय घेत ज्येष्ठ वकिलांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे.

अशोक खरातने अनेक महिलांची फसवणूक करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देश हादरला आहे. खरातच्या या कृत्याचा पर्दाफाश झाल्यानंतर त्याच्याविरोधात आता तक्रारी वाढू लागल्या आहेत. आयपीएस तेजस्वी सातपुते प्रमुख असलेल्या विशेष तपास पथकाकडून मागील सहा दिवसांपासून चौकशी केली जात आहे.

राज्य सरकारने याप्रकरणी आता विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ अजय मिसर यांची नियुक्ती केली आहे. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने खरातला कठोर शिक्षा व्हावी, या उद्देशाने सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचअनुषंगाने सरकारची बाजू अधिक भक्कम करण्यासाठी अत्यंत अनुभवी अशा विधिज्ञ मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कोण आहेत अजय मिसर?

अजय मिसर यांनी राज्यातील अनेक हायप्रोफाईल खटल्यांमध्ये सरकारची बाजू मांडली आहे. त्यामध्ये २००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचाही समावेश आहे. त्याचप्रमाणे दादर ऑपेरा हाऊस बॉम्बस्फोट, रवी पुजारी प्रकरण, धान्य घोटाळा आदी खटल्यांमध्ये मिसर यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले आहे.

दरम्यान, अशोक खरात या प्रकरणात मिसर यांची नियुक्ती झाल्याने आरोपींना कठोर शिक्षा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. खरात याचे दररोज नवे कारनामे समोर येत आहेत. त्याच्याविरोधात एसआयटीकडे सबळ पुरावे असून आता मिसर यांच्या नियुक्तीने कोर्टात सरकारची बाजू भक्कम होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT