Rupali Chakankar SIT .jpg Sarkarnama
महाराष्ट्र

Rupali Chakankar Inquiry: 'मी महिला आहे अन्....'; रूपाली चाकणकरांची खरात प्रकरणी 'SIT' चौकशीसाठी टाळाटाळ?

Nashik Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस आणि एसआयटीकडून चाकणकर यांना समन्स बजावली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी फेसबूकवर पोस्ट करत चाकणकरांच्या एसआयटीने चौकशीसाठी हजर राहण्याबाबत बजावलेल्या समन्सची माहिती दिली होती

Deepak Kulkarni

Nashik Crime Case: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानं सगळ्यांचीच झोप उडवली आहे. या प्रकरणात खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानं रुपाली चाकणकरांना आधी राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद आणि दबाव वाढल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा द्यावा लागला होता. पण यानंतरही चाकणकरांच्या अडचणी कमी होताना दिसून येत नाही. कारण या प्रकरणात नेमलेल्या एसआयटीच्या पथकाकडून चाकणकरांना चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावले होते. पण आता याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.

राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी एसआयटीच्या चौकशीलाच हजर राहण्याबाबत समन्स बजावले होते. मात्र, चाकणकरांनी या एसआयटी चौकशीला नाशिकला हजर राहण्यास नकार दिल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे पुन्हा एकदा विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी अशोक खरात प्रकरणी आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली नेमण्यात आलेल्या एसआयटीच्या चौकशीला सामोरे जाण्यास नकार दिल्याची माहिती समोर येत असून त्यांनी दोन कारणंही दिल्याचं बोललं जात आहे. यात चाकणकरांनी नाशिकला एसआयटीच्या चौकशीला सामोरे जाण्यास नकार देतानाच मी महिला आहे आणि प्रवासात वेळ जात असल्याचं क्षुल्लक कारण दिल्याची चर्चा आहे.

अशोक खरात प्रकरणातील स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीममार्फत सध्या नाशिक पोलिस अकॅडमी येथे सुरू चौकशी सुरू आहे. पण आता ही चौकशीच पुणे किंवा मुंबईमध्ये येथे करण्यात यावी अशी मागणी चाकणकरांनी केल्याची सूत्रांची माहिती आहे.

महत्वाची बाब म्हणजे एसआयटी चौकशीला हजर राहण्यास हजर राहण्यास नकार दिल्याची चर्चा असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर या त्यांच्या पुण्यातील निवासस्थानीही नसल्याची माहिती समोर येत आहे. त्या नाशिकला रवाना झाल्याची अपडेट समोर येत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण सध्या प्रचंड गाजत आहे. या प्रकरणामुळे अनेक राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

भोंदूबाबा अशोक खरातसोबत चाकणकरांचे काही फोटो व्हायरल झाले होते. यानंतर रुपाली चाकणकर यांना अशोक खरात याच्याशी जवळचे संबंध असल्यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनाम्यासाठी मागणी जोर धरू लागली होती. अखेर शुक्रवारी(ता.27 मार्च) त्यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला.

अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस आणि एसआयटीकडून चाकणकर यांना समन्स बजावली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी फेसबूकवर पोस्ट करत चाकणकरांच्या एसआयटीने चौकशीसाठी हजर राहण्याबाबत बजावलेल्या समन्सची माहिती दिली होती. एसआयटीकडून खरातच्या शिवनिका या संस्थेच्या सदस्यांना चौकशीसाठी बोलण्यात येणार असल्याचं समोर आलं होतं. ही चौकशी संस्थेच्या निधीचा वापर आणि खरात संदर्भात होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT