

Ashok Kharat Case : स्वयंघोषित ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरु अशोक खरात याची एसआयटीकडून कसून चौकशी सुरु आहे. रोज या प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत. खरातला काल ३ दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याने SIT तपासाला वेग आला आहे. त्यातच आज एसआयटीनं अशोक खरातच्या ऑफिसमध्ये जाऊन पडताळणी केली. या ठिकाणी त्यांना काही महत्वाचे पुरावे हाती लागले आहेत. खरातनं आपल्या ज्या ऑफिसमध्ये महिलांचं लैंगिक शोषण केलं त्याच ऑफिसमध्ये पोलिसांनी पीडित महिलांना नेऊन प्रत्यक्ष पुराव्यांची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न केला.
नाशिकमधील ओकस प्रॉपर्टी या अशोक खरातच्या ऑफिसमध्ये एसआयटीनं आज झाडाझडती घेतली. यावेळी अत्याधुनिक उपकरणांचा वापर पोलिसांनी पुरावे गोळा करण्यासाठी केला. यामध्ये मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनसह एसआयटीनं डिजिटल पंचनामा केला. त्याचबरोबर पीडित महिलेला घेऊन SIT नं खरातच्या ऑफिसमध्ये लाईव्ह स्क्रिनिंग केलं. यामुळं खरातच्या विरोधात लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आत्तापर्यंत खरातवर ८ लैंगिक शोषणाचे तर दोन अर्थिक फसवणुकीचे गुन्हे खरातवर दाखल आहेत.
दरम्यान, १ एप्रिलपर्यंत आणखी दोन दिवस खरातची पोलीस कोठडी असल्यानं एसआयटीनं तपासाला वेग दिला आहे. त्यामुळं खरातच्या ऑफिसची पुन्हा एकदा झाडाझडती घेऊन एसआयटीनं काही महत्वाचे पुरावे जप्त केले आहेत.
खरातचे महिलांच्या लैंगिक शोषणाचे ५८ हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांनी तपासाच्या सुरुवातीलाच जप्त केले होते. त्यानंतर महाराष्ट्र नरबळी, अघोरी प्रथा व जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या त्याच्यावर एकूण दहा गुन्हे दाखल आहेत, यामध्ये आता आणखी गुन्ह्यांची भर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं खरातचा पाय आणखी खोलात अडकत चालला असल्याचं चित्र आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.