Mumbai News : भोंदूबाबा अशोक खरातचे काळे कारनामे जनेतसमोर आले आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधातील कारवाईचा फास पोलिसांनी आवळला आहे. राज्यातील विरोधी पक्षाने या विरोधात आवाज उठवला. त्यामुळेच राज्य सरकारवरील दबाव वाढला आहे. त्यातच रुपाली चाकणकर यांचे भोंदूबाबा खरात यांच्या सोबतचे फोटो समोर आल्याने त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक शनिवारी पार पडली. यामध्ये रुपाली चाकणकर यांच्याकडे असलेले महिलांचे प्रदेशाध्यक्षपदही जाणार? असल्याचे समजते. त्यामुळे आता प्रदेशाध्यक्षपद रिक्त झाल्यास या पदासाठी चर्चेत असलेल्या 'या' पाच महिलांपैकी एकाची वर्णी लागू शकते.
भोंदूबाबा अशोक खरातशी जवळीक असणाऱ्या रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पण त्यांच्यामागचे शुक्लकाष्ट थांबायचे नाव घेत नाहीये. एकीकडे सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे यांनी त्यांच्या अटकेची मागणी करत वातावरण तापते ठेवले आहे. त्यातच मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पण सोडावे लागणार असल्याचे समजते.
गेल्या आठ दिवसात सातत्याने चाकणकर प्रचंड ट्रोल होत आहेत. त्यामुळे त्यांना प्रदेशाध्यक्षपदही सोडावे लागणार असल्याची चर्चा जोरात सुरु आहे. अजित पवार नसताना आणि नेतृत्व म्हणून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) नवीन असताना त्या चाकणकरांना पदावर ठेवून धब्बा लावून घेणार नाहीत. आत्ता जे काय घडतंय ते बघता चाकणकरांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट कोणी पाठिंबा देईल किंवा मागे उभे राहील असे वाटत नाही. त्यामुळेच त्या पदावर राहतील, अशी शक्यता कमी आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिला प्रदेशाध्यक्षपद रिक्त झाल्यास या पदासाठी या महिलांची नावे चर्चेत आहेत. त्यामध्ये आमदार सना मलिक यांचे नाव पुढे आले आहे. त्या आमदार आहेत. नवाब मालिकांची मुलगी, अल्पसंख्यांक चेहरा म्हणून त्यांचा प्राधान्याने विचार होऊ शकतो. मात्र, भाजपकडून त्यांच्या नावाला विरोध केला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर आमदार सरोज अहिरे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. उत्तर महाराष्ट्रातून येत असलेल्या अहिरे देवळालीच्या आमदार आहेत. सध्या त्यांच्याकडे पक्षात मोठं पद नाही. तर दुसरीकडे वक्तृत्व तितकं ताकदीचं नाही, नाव सर्वांना माहिती नाही, संघटन कौशल्यावर प्रश्नचिन्ह असल्याने अडचण आहे.
या पदासाठी वैशाली नागवडे यांचे नाव चर्चेत आहे. हुशार, प्रगल्भ, पक्षातल्या कामाचा अनुभव, महानंदाच्या अध्यक्षपदाचा अनुभव, पश्चिम महाराष्ट्रातून येतात. तर मागच्या काही वर्षांपासून मागे पडल्या असल्याने अडचण आहे. त्याशिवाय या पदासाठी पुण्याच्या माजी महापौर राजलक्ष्मी भोसले यांचे नावही चर्चेत आले आहे. त्या सुनेत्रा पवारांच्या निकटवर्तीय असून पश्चिम महाराष्ट्राची पार्श्वभूमी आहे. त्या वयाने ज्येष्ठ आहेत, काही वर्षांपासून राजकारणात मागे पडल्या असल्याची अडचण आहे.
त्याशिवाय या पदासाठी रुपाली ठोंबरे यांचे नाव घेतले जात आहे. त्या आक्रमक आहेत, चाकणकरांच्या विरोधात कडवी भूमिका, सर्वांना माहिती असणारे नाव आहे. पुण्यातून म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रातून येतात. अति आक्रमक भूमिका, संघटनेत विरोध होण्याची शक्यता ही अडचण आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास ही नावे येणार चर्चेत
याशिवाय येत्या काळात जर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास शरद पवार यांच्या पक्षातील माजी आमदार विद्या चव्हाण, माजी खासदार फौजिया खान, माजी खासदार वंदना चव्हाण, रोहिणी खडसे त्यांच्यापैकीही कोणाला संधी मिळू शकते. त्यामुळे आतापासूनच उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.