Ashok Kharat case exposes shocking abuse tactics as SIT probe uncovers codewords, exploitation, and a growing network of victims. Sarkarnama
महाराष्ट्र

Ashok Kharat : ऑफिसबाहेर गर्दी तरीही खरातला अश्लील चाळे करताना कोणी डिस्टर्ब का करत नव्हतं? SIT तपासात धक्कादायक खुलासा

Ashok Kharat case, SIT investigation : अंकशास्त्राचा आधार घेत अशोक खरात अनेक तरुण मुलींचे मोठ्या अधिकाऱ्यांशी आणि उद्योगपतींशी संबंध जुळवून द्यायचा, अशी माहिती देखील तपासातून समोर येत आहे. त्यामुळे या खरातचं नेटवर्क किती मोठं होतं आणि त्याच्या या जाळ्यात अशा किती मुली अडकल्या होत्या याबाबतचा तपास एसआयटीकडून सुरू आहे.

Jagdish Patil

Ashok Kharat SIT Probe, 27 Mar : ज्योतिष आणि अंकशास्त्राच्या नावाखाली महिलांसोबत अश्लील चाळे करणाऱ्या भोंदू अशोक खरातची कुंडली आता एसआयटी तपासातून हळूहळू उलघडली जात आहे. या तपासात खरात अनेक धक्कादायक गोष्टींची कबुली देत आहे.

अशीच एक धक्कादायक माहिती आता तपासातून समोर आली आहे. ती म्हणजे अशोक खरात त्याच्या केबिनमध्ये महिलांचे लैंगिक शोषण करण्याआधी त्यांच्या नवऱ्यासमोर या महिलांची स्तुती करायचा आणि मग त्यांना आपल्या केबिनमध्ये घेऊन जायचा. शिवाय तो महिलांवर अत्याचार करताना आतमध्ये कोणालाही प्रवेश नसायचा.

कारण खरात हे काळे कारनामे करताना ऑफीसमध्ये कोडवर्डस् वापरायचा. यामध्ये एसआयटीने त्याच्या झुंबर कोडवर्डचा उलघडला केला आहे. त्यानुसार खरात केबिनमध्ये महिलांशी अश्लील चाळे करण्याआधी तो केबिन बाहेर असलेल्या झुंबराचा दिवा बंद करायचा. या झुंबराचा दिवा बंद असेपर्यंत केबिनमध्ये कोणालाच प्रवेश नसायचा.

महत्त्वाचं म्हणजे त्याच्या कार्यालयात काम करणाऱ्या कामगारांना या कोडवर्डची माहिती होती. त्यामुळे जोपर्यंत झुंबर बंद तोपर्यंत हा नको ते उद्योग आतमध्ये करायचा आणि झुंबर बंद झाल्यानंतर मग इतरांना आतमध्ये प्रवेश मिळायचा. त्यामुळे आता खरात आतमध्ये महिलांचं शोषण करताना त्याला कोणीच विरोध कसा केला नाही, याचं उत्तर समोर आलं आहे.

दरम्यान, खरात या महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी संबंधित महिलेच्या पतीला त्याच्या पत्नीसमोरच सांगायचा की, 'तुझ्या यशामागे तुझ्या पत्नीचा मोठा वाटा आहे,' नवऱ्यासमोर केलेल्या कौतुकामुळे महिलांच्या मनात सहानुभूती आणि विश्वास निर्माण व्हायचा आणि मग तो त्यांना केबिनमध्ये घेऊन जायचा अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

शिवाय अंकशास्त्राचा आधार घेत तो तरुण मुलींचे मोठ्या अधिकाऱ्यांशी आणि उद्योगपतींशी संबंध जुळवून द्यायचा, अशी माहिती देखील तपासातून समोर येत आहे. त्यामुळे या खरातचं नेटवर्क किती मोठं होतं आणि त्याच्या या जाळ्यात अशा किती मुली अडकल्या होत्या याबाबतचा तपास एसआयटीकडून सुरू आहे. त्यामुळे या तपासात खरातशी संबंधित आणखी मोठ्या अधिकाऱ्यांची नावे समोर येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT