Ashok Kharat HIV Test : अशोक खरातचा HIV रिपोर्ट आला समोर; पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, नेमकं सत्य काय?

Ashok Khara HIV test report : नाशिक पोलिसांत अशोक खरातवर महिला अत्याचार संदर्भात 7 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे त्याने आणखी किती महिलांचा गैरफायदा घेतला आहे आणि त्याच्या या कृत्यामुळे HIV सारखा आजार तर त्याला झाला नाही ना? अशा चर्चांना उधाण आलं होतं. याबाबतची चर्चा विधानसभेत देखील झाली.
Ashok Kharat HIV Report
Ashok Kharat HIV ReportSarkarnama
Published on
Updated on

Ashok Kharat News, 27 Mar : महिलांवरील अत्याचार आणि फसवणूक प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदूबाब अशोक खरात प्रकरणी दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्याच्या विरोधात अनेक महिलांनी आपल्यावर अत्याचार केल्याच्या तक्रारी केल्या आहेत.

या प्रकरणी नाशिक सत्र न्यायालयाने आरोपी अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणाची व्याप्ती बघता काही नेत्यांनी अशोक खरात आणि त्याला भेटलेल्या सर्वांची एचआयव्ही टेस्ट करा, अशी मागणी केली होती.

त्यानंतर आता अशोक खरातचे एचआयव्ही टेस्ट केली असून टेस्टचे रिपोर्ट समोर आले आहेत. सध्या खरातची एसआयटीकडून चौकशी सुरु आहे. याच चौकशी दरम्यान अशोक खरातची एचआयव्ही टेस्ट केली. या टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे.

Ashok Kharat HIV Report
Ashok Kharat Case : खरातच्या आहारी गेलेल्या आमदाराला बायकोने दरबारात जाऊन भरला होता दम, 'त्या' माजी मंत्र्याचीच पडली विकेट?

रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे मोठा अनर्थ टळला असून त्याने अत्याचार केलेल्या महिलांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्योतिष सांगण्याच्या नावाखाली खरातने जवळपास 150 हून अधिक महिलांवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे.

नाशिक पोलिसांत त्याच्यावर महिला अत्याचार संदर्भात 7 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे त्याने आणखी किती महिलांचा गैरफायदा घेतला आहे आणि त्याच्या या कृत्यामुळे एचआयव्ही सारखा आजार तर त्याला झाला नाही ना? अशा चर्चांना उधाण आलं होतं. याबाबतची चर्चा राज्याच्या विधानसभेत देखील झाली.

Ashok Kharat HIV Report
Narhari Zirwal video : नरहरी झिरवाळांना राष्ट्रवादीतून मिळाला पहिला पाठिंबा : अशोक खरात प्रकरण अंगलट येतंय म्हणून डाव टाकल्याचा दावा

मात्र, अखेर आता खरातची एचआयव्ही टेस्टचे रिपोर्ट समोर आल्यामुळे मोठा धोका टळल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, भोंदूबाबा अशोक खरात ज्या कार्यालयात अश्लील चाळे करायचा त्या ओकस कार्यालयाला एसआयटीने टाळं ठोकलंआहे. एसआयटी आणि फॉरेन्सिक टीमने कार्यालयाची तपासणी करत कार्यालयातून प्रिंटर आणि महत्त्वाची कागदपत्रं ताब्यात घेतली आहेत. त्यामुळे आता या तपासाला आणखी वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Ashok Kharat HIV Report
Ashok Kharat Case: सरकारी अधिकाऱ्यांच्या पत्नीदेखील खरातच्या जाळ्यात; 10 तास चौकशी, म्हणाला, '...केलेली कृती हा विधीचाच एक भाग'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com