Ashok Kharat Nashik Office Raid Sarkarnama
महाराष्ट्र

Ashok Kharat case : खरात प्रकरणाचे 'सीक्रेट' सीएम फडणवीसांकडेच उघड करणार! अंधारेंच्या विधानाने सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले; कोणता मोठा गौप्यस्फोट होणार?

CM Devendra Fadnavis News : खरात यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी अनेक महिला पुढे आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा एसआयटीकडून तपास केला जात आहे. त्यामुळे खरात यांनी केलेले काळे कारनामे समोर येत आहेत. आतापर्यंत आठ महिलांनी लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी दिल्या आहेत तर दोन जणांनी आर्थिक फसवणुकीच्या तक्रारी केल्या आहेत. खरात यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी अनेक महिला पुढे आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे.

राज्य सरकार समोरील अडचणी वाढल्या असतानाच आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी खरात प्रकरणाचे 'सीक्रेट' सीएम देवेंद्र फडणवीसांकडेच उघड करणार असल्याचे विधान केल्याने सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले असून त्या कोणता मोठा गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अशोक खरात प्रकरण हे अत्यंत नाजूक आहे. यामधील काही गोष्टी सीएम फडणवीसांना (Devendra fadnavis) भेटूनच सांगणार आहे, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी सस्पेन्स वाढवला आहे. एकीकडे खरात प्रकरणाचा तपास करीत असताना धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. हे प्रकरण केवळ महिला लैंगिक शोषणापुरते मर्यादित नसून व्यापक स्वरूपाचे प्रकरण असल्याचा दावा समोर आला आहे. या प्रकरणाचा ‘लॉजिकल एंड’ गाठायचा असेल, तर सर्व संबंधित पैलूंची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे सुषमा अंधारेंनी स्पष्ट केले आहे.

या प्रकरणात शिवनिका ट्रस्ट, काही ब्लॉगर तसेच नामकरण आवारे यांची चौकशी अद्याप बाकी आहे. याशिवाय, चाकणकर यांच्याबाबतही चौकशी न झाल्याचा मुद्दा सुषमा अंधारेंनी उपस्थित केला. या संदर्भात सुषमा अंधारेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेटीसाठी वेळ मागितली असून, काही महत्त्वाची माहिती थेट त्यांच्या समोर मांडण्याची गरज असल्याचे सांगितले जात आहे. काही संवेदनशील बाबी सार्वजनिकपणे मांडता येत नसल्याने हा विषय अत्यंत सावधगिरीने हाताळण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

दरम्यान, या प्रकरणात काही माजी व विद्यमान लोकप्रतिनिधींचा संबंध असल्याची शक्यता व्यक्त केली असून, त्या अनुषंगानेही चौकशीची मागणी सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare)केली आहे. खरात यांच्या पत्नीच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी, तसेच ‘व्यंकटेश’ कंपनीतील व्यवहारांची चौकशी करण्याचीही मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे. यासोबतच, संबंधित प्रकरणात नाव येत असलेल्या अधिकारी भांडे यांचे निलंबन करावे, अशीही मागणी सुषमा अंधारेंनी केली आहे. सृष्टी खरात यांच्याबाबतही चौकशी व्हावी, अशी मागणी अंधारेंनी केली आहे.

अशोक खरातला न्यायालयीन कोठडी

दरम्यान, नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 1 एप्रिलला नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायाधीश श्रीमती बी इन ईचपुरानी यांच्या कोर्टात अशोक खरातला हजर केलं होतं. अशोक खरातची पोलीस कोठडी संपल्याने आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. सध्या एसआयटीकडून अशोक खरातची चौकशी सुरु आहे. त्यामुळे अशोक खरातची कोठडी वाढवण्याची मागणी एसआयटीकडून करण्यात आली. अशोक खरातवर दाखल असणाऱ्या अत्याचाराच्या पहिल्या गुन्ह्यात याधी तीनवेळा त्याला पोलीस कोठडी सूनवण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT