Vijay Vadettiwar allegations: भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरण राज्यभर चर्चेत आहे. विधिमंडळाच्या अधिवेशन सुरू असल्याने सरकारवर दबाव आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात काय होते याची उत्सुकता वाढली आहे. भोंदू तांत्रिक कॅप्टन अशोक खरात प्रकरण अनेकांची अडचण करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्या रूपाली चाकणकर यांना महिला आयोगाचा राजीनामा द्यावा लागला आहे. विरोधकांनी या प्रश्नावर सरकारला घेरण्याची तयारी केली आहे.
यासंदर्भात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर (Vijay wadettivar) यांनी गंभीर आरोप केला आहे. राज्य सरकारमधील अनेक मोठे नेते अशोक खरात प्रकरणात अडकले आहेत. त्यांची नावे या प्रकरणात आल्याने सरकार अडचणीत येऊ शकते. हे प्रकरण दाबण्यासाठी राज्य सरकारकडून विविध प्रकारे प्रयत्न केले जाणार आहेत. त्या दृष्टीने तपास यंत्रणेवर मोठा दबाव आहे. तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरही दबाव आहे, असा दावा त्यांनी केला.
कॅप्टन अशोक खरात यांच्या समवेत अनेक नेते आणि मंत्र्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. यात राज्य सरकारमध्ये अनेक वजनदार नेते आहेत. त्यांचा या प्रकरणात संबंध आहे हे लपून राहिलेले नाही. मात्र फोटो आहेत म्हणून लगेच आम्ही त्यांची नावे घेणार नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.
पुढील आठवड्यात विधिमंडळाच्या अधिवेशनात या प्रश्नावर सरकारला घेरण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने आम्ही सर्व माहिती जमा केली आहे. सरकार या प्रकरणात आपली जबाबदारी झटकू शकत नाही. पुरोगामी महाराष्ट्रात अशा प्रकारे अंधश्रद्धा पसरविली जात आहे. थेट सरकारचे मंत्री त्यात सहभागी होतात. सरकार याबाबत डोळे मिटून आहे. हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही, असे वडेट्टीवार म्हणाले.
रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिलेल्या राजीनामा पत्राबाबतही वडेट्टीवार यांनी त्यांचा समाचार घेतला. चाकणकर आणि कॅप्टन अशोक खरात यांच्यात काय संपर्क आणि संबंध आहे हे सगळ्यांना कळले आहे. त्यामुळेच त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. राजीनामा पत्रात वैयक्तिक कारण लिहिणाऱ्या चाकणकर यांच्याबाबत जनतेला सर्व कळते, असे वडेट्टीवार म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.