Rupali Chakankar controversy: अशोक खरातप्रकरणी प्रफुल पटेलांचा यु टर्न; म्हणाले, 'फोटोवरून कुणी दोषी...'

Rupali Chakankar controversy News : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार प्रफुल पटेल यांनी शुक्रवारी सकाळी याबाबत राष्ट्रवादी म्हणून संबंधित असलेल्या नेत्यावर योग्य कारवाई करणार असल्याचे म्हटले होते.
Praful Patel
Praful Patel Sarkarnama
Published on
Updated on

gondiya news : महाराष्ट्रात गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विरोधकांकडून राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली जात आहे. त्यातच भोंदूबाबा असलेल्या अशोक खरात यांच्या समवेतचे अनेक राजकीय नेत्यांचे फोटो असल्याचे समोर आले आहेत तर दुसरीकडे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पाद्यपूजन केले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार प्रफुल पटेल यांनी शुक्रवारी सकाळी याबाबत राष्ट्रवादी म्हणून संबंधित असलेल्या नेत्यावर योग्य कारवाई करणार असल्याचे म्हटले होते. मात्र, आता गोंदियात पोहचताच या विधानावरून युटर्न घेतला आहे.

गोंदिया येथे माध्यमांशी बोलत असताना अशोक खरात प्रकरणावरून सवाल उपस्थित केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार प्रफुल पटेल यांनी अखेर मौन सोडले आहे. कोणाचे फोटो कोणासोबत आहेत, यावरून एखादी व्यक्ती दोषी ठरत नाही; मात्र तपासातून जे सत्य समोर येईल, त्यानुसार योग्य कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करत प्रफुल पटेल यांनी पक्षाची भूमिका मांडली.

Praful Patel
Sangli Politics : सांगली जिल्हा परिषदेत टांगा पलटी झाल्यानंतर जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाचे गुपित चंद्रकांत पाटलांनी केलं उघड; म्हणाले, "संजयकाका साक्षीदार..."

त्यापूर्वी शुक्रवारी सकाळी बोलताना अशोक खरात यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. तसेच त्यांच्या सोबत या कामात जे राहिले असेल तर निश्चित त्यांची नावे चौकशीत समोर येतील त्यांच्यावरही तातडीने आणि सक्तीने कारवाई केली गेली पाहिजे. काही राजकीय नेत्यांचा नाव त्यांच्याशी जोडलं गेलं आहे. नक्की आम्ही राष्ट्रवादी म्हणून योग्य कारवाई करणार आणि तुम्हाला या एक दोन दिवसात ते दिसेल, असे म्हणत पटेल यांनी चाकणकरांवर कारवाईचे संकेत दिले होते.

Praful Patel
Ashok Kharat Crime: खरात 'कनेक्शन' अंगलट,राजीनाम्यासाठी दबाव; चाकणकरांनी घेतली थेट 'डीजीपी' दातेंची भेट, दिली 'ही' मोठी अपडेट

गोंदियात पोहचताच या विधानावरून त्यांनी युटर्न घेतला आहे. त्यामुळे आता काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान अशोक खरात प्रकरणात गंभीर आरोप झाले आहेत तर राजीनाम्यासाठी दबाव वाढत असल्याने शुक्रवारी सायंकाळी रुपाली चाकणकरांनी थेट DGP सदानंद दातेंची भेट घेतली आहे.

Praful Patel
Sunil Tatkare : रूपाली चाकणकरांचा राजीनामा घेणार का? खरात प्रकरणावर अखेर राष्ट्रवादीची भूमिका सुनील तटकरेंनी केली स्पष्ट

त्यांनतर लवकरच या विषयावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर पत्रकार परिषद घेत बाजू मांडणार आहेत. त्यामुळे त्या काय खुलासा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी दिवसभर त्या मुंबईत होत्या. यावेळी त्यांनी अनेक नेत्यांची भेट घेतली असल्याचे समजते.

Praful Patel
Marathwada unseasonal rain: मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने मोठे नुकसान; मंत्री पंकजा मुंडेंनी दिले जिल्हा प्रशासनाला 'हे' आदेश

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com