Ashok Kharat Case | Rupali Chakankar Sarkarnama
महाराष्ट्र

Ashok Kharat Scam: खरातचं नवं धक्कादायक प्रकरण समोर; चाकणकरांच्या बहीण-पुतण्यासह अधिकाऱ्यांंच्या नावे बोगस बँक खाती, कोट्यवधींचा घोटाळा

Ashok Kharat Shirdi Fraud Case : शिर्डी खरातसह त्याची पत्नी कल्पना खरातवर शेतकऱ्यांची फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांच्या हाती मोठा आर्थिक घोटाळा लागला आहे.

Deepak Kulkarni

Shirdi News : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची राज्यासह संपूर्ण देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकरणी महिला आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या एसआयटी पथकाच्या तपासात दिवसागणिक अशोक खरातचे अनेक धक्कादायक कारनामे समोर येत आहे. शिर्डीतील खरातसह त्याची पत्नी कल्पना खरातवर शेतकऱ्यांची फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांच्या हाती मोठा आर्थिक घोटाळा लागला आहे.

नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातवर शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला गुरुवारी (ता.2 एप्रिल) जिल्हा सत्र न्यायालयानं 8 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आता याच खरातविरोधात आत्तापर्यंत अत्याचार व फसवणुकीचे एकूण अकरा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशातच आता भोंदूबाबा अशोक खरातनं तब्बल 130 बनावट बँक खाती उघडून कोट्यवधी रुपयांची उलाढाल केल्याची धक्कादायक बाब उघड झाले आहे.

आरोपी अशोक खरातने 2021-22 या कालावधीत सुमारे 130 लोकांच्या नावे विविध पतसंस्थांमध्ये खाती उघडली आहेत. यात समता, जगदंब पतसंस्थेसह अनेक ठिकाणी ही बोगस खाती तयार करण्यात आल्याचं समोर आलं आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे बोगस खाती उघडण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरांची बहीण आणि पुतण्यांच्याही नावांचादेखील समावेश असल्याचं समोर येत आहे.

अशोक खरातनं अनेक पतसंस्थांमध्ये 130 व्यक्तींच्या नावे उघडलेल्या बनावट खात्यांमध्ये स्वत:लाच ‘नॉमिनी’ म्हणून दाखवल्याची धक्कादायक बाबही समोर येत आहे. या बॅँक खात्यांतून एका दिवसात लक्षावधी रुपयांचे व्यवहार होत असल्याची चक्रावून सोडणारी माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.

खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासूद यांच्यासह चाकणकरांच्या भगिनी व पुतण्यांच्या नावानंही खाती उघडण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच यापुढची धक्कादायक बाब म्हणजे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावांचाही वापर करण्यात या बोगस अकाऊंट काढताना करण्यात आल्याची शक्यता आहे.

शिर्डी येथे भोंदू अशोक खरातसह त्याची पत्नी कल्पना खरातवर शेतकऱ्यांची फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच कल्पना खरात फरार झाल्या आहेत. त्यांच्याविरोधात आता पोलिसांनी लूकआऊट नोटीस काढली आहे. कल्पना खरात यांचा तपास लावण्यासाठी एसआयटी पथकानं त्यांच्या नाशिक येथील घरीही धाड टाकली होती. पण तिथे त्याआधीच त्या तिथून त्यांनी पळ काढला होता. मात्र, एसआयटीच्या पथकानं त्यांचा मुलगा हर्षवर्धन खरातला ताब्यात घेत चौकशी केली. त्यानंतर त्याची सुटका देखील केली आहे.

मात्र, शेतकऱ्यांची फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारकी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींकडून खरातच्या पतसंस्थामधील बनावट खात्यांबाबत मार्फत सुरू असलेल्या आर्थिक गैरव्यवहाराचे महत्त्वाचे धागेदोरे समोर समोर आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT