ED action on Ashok Kharat: अनेक महिलांना फसवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणारा नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात याची आता ईडीकडून चौकशी सुरू झाली आहे. सोमवारी पहाटेपासून ईडी आणि इन्कम टॅक्सच्या पथकाने त्याच्या बंगल्यावर तपासणी केली. ईडीच्या पथकाने खरातची आलिशान एसयूव्ही जप्त केली आहे.
आता अशोक खरातच्या मुसक्या आवळण्यास तपास यंत्रणांनी सुरवात केली आहे. तब्बल तेरा तासाहून अधिक वेळ अशोक खरातची ईडीने चौकशी केली. यात ईडीच्या हाती मोठ घबाड सापडल्याची माहिती आहे. छापेमारीत अशोक खरातकडे कोट्यवधींची मालमत्ता असल्याचे पुरावे मिळाले आहे.
सकाळपासून भोंदू अशोक खरात याच्या तृप्तबाला घराची ईडीकडून १३ तासांपासून जास्त वेळ झाडाझडती सुरु होती. या कारवाईमध्ये खरात याची आलिशान मर्सिडीज गाडी ED कडून सील,ईडीने आत्तापर्यंत 100 पेक्षा जास्त दस्तऐवजांची तपासणी केली असल्याची माहिती आहे. खरात व त्याच्या संबंधित 11 ठिकाणी सोमवारी ईडीने छापेमारी केली आहे.
ईडी पथकाने खरातच्या शिवनिका संस्थेच्या कार्यालयातून महत्त्वाचे कागदपत्र जप्त केली आहेत. मिरगाव येथील शिवनीका संस्थान कार्यालय, जगदंबा पतसंस्थेतही ईडीच्या पथकाकडून चौकशी करण्यात आली. तर काही बँक स्टेटमेंटसह कागदपत्रांची माहितीही ED ने घेतली. मंदिरातील पुजारी व कर्मचारी यांचे देखील ईडी कडून चौकशी झाली.
ईडीने सोमवारी नाशिकमध्ये 5 तर शिर्डी आणि पुण्यात मिळून एकूण 11 ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवले होते.
अशोक खरातच्या जवळपास 10 कोटींच्या मालमत्तेची कागदपत्रांच्या आधारे ओळख पटली.
अशोक खरातची 2 कोटी 50 लाखांची बँकेतील रक्कम गोठवली आहे.
खरातची एक मर्सिडीज बेंझ गाडीही जप्त करण्यात आलीय.
पुण्यातील प्रकाश पोफळेच्या घरातून 42 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.
काही खात्यांमधून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार (अंदाजे 50–60 कोटी) झाल्याची माहिती समोर आली
रोख व्यवहार आणि “माया जाळे” याची चौकशी सुरू
सोलापूरसह इतर ठिकाणी कोट्यवधींची जमीन खरेदी
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.