Ashok Kharat News: अशोक खरातचे नवनवे कारनामे समोर येत आहेत. अनेक बडे उद्योजक,व्यावसायिक, राजकारणी हे खरातचे भक्त होते. ते अडचणी घेऊन त्याच्याकडे जात होते. आपली संपत्ती आणि व्यावसायाची माहिती मोठ्या विश्वासने ते त्याला सांगत होते. आणि अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मदत मागत होते. या भक्तांनी दिलेल्या माहितीचा वापर खरात त्यांच्या विरोधात करत असल्याचे समोर आले आहे.
'स्पेशल 26' या सिनेमाप्रमाणे बनावट सीबीआय, प्राप्तिकर विभागाचे बनावट अधिकारी खरात आपल्याच बड्या भक्तांच्या घरी पाठवत त्यांना गंडवत होता आणि त्यांच्याकडून पैसे उकळत होता,अशी धक्कादायक माहिती शिर्डी पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.
शिर्डीतील बेकायदेशीर सावकारकीच्या तपासांमध्ये भोंदूबाबा अशोक खरात आपल्याच भक्तांना गंडवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने पोलिस देखील चक्रावून गेले आहेत. बडे उद्योजक आणि व्यावसायिक हे त्याच्याकडे भक्त म्हणून येत होते. ते आपले सर्व धंदे विश्वासाने अशोक खरातला सांगत होते. यातून अशोक खरात याच्याकडे मार्ग मागत होते. तंत्रमंत्राने संरक्षण घेत होते. यातून अशोक खरात याच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये माहिती गोळा होत होती.
त्याचवेळेस समांतरपद्धतीने या बड्या उद्योजकांना आणि व्यावसायिकांकडील पैसे उकळण्यासाठी प्राप्तिकर विभागाच्या बनावट अधिकाऱ्यांची जुळवाजुळव करून छापे घालत होता. पुढे छापे पडल्यानंतर खरातच मध्यस्थी करायचा आणि तडजोडीतून कोट्यवधींची रक्कम उकळत होता. अहिल्यानगर मधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूत्राकडून या माहितीला दुजोरा मिळाला आहे.
अशोक खरात याच्याकडे या बनावट छाप्या विषयी देखील तपास करणार आहेत. ही छापे कुठे? कधी? केव्हा घातले? प्राप्तिकर अधिकारी म्हणून तो कोणाला पाठवत होता? छाप्यातून किती रक्कम गोळा करत होता? या रकमेचे पुढे काय केले? या सर्व गोष्टींची चौकशी शिर्डी पोलिस करणार आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान शिर्डी इथल्या साईबाबा संस्थान कर्मचारी असलेला विकास दिवटे यांच्या आत्महत्या प्रकरणात अशोक खरात याचे नाव चर्चेत होते. परंतु तपासामध्ये त्याच्याविरुद्ध सबळ पुरावा न आढळणारे आरोपपत्रातून नाव वगळण्यात आले. या प्रकरणाची फेरचौकशी व्हावी, अशी मागणी मयत दिवटे यांच्या भावाने पोलिसांकडे केली आहे. यासाठी शिर्डी पोलिसांकडे अर्ज देखील दाखल केला आहे.
मयत दिवटे यांच्या भावाचा अर्ज शिर्डी पोलिसांना प्राप्त होताच, याबाबत न्यायालयात पोलिसांकडून प्रस्ताव सादर करण्यात आला असून, सरकारी वकिलांचा अभिप्राय घेऊन कायदेशीर कारवाई करण्याची तयारी शिर्डी पोलिसांनी केली आहे. तसेच शिर्डीतील रावसाहेब गोंदकर यांच्या जमीन खरेदी प्रकरणात फसवणुकीचे आणि आर्थिक गैर व्यवहाराचे पुरावे देखील शिर्डी पोलिसांना आढळले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.