Ashok Kharat video sale controversy Sarkarnama
महाराष्ट्र

Ashok Kharat Video: धक्कादायक! अशोक खरातच्या अश्लील व्हिडिओंची 15 ते 20 रुपयांमध्ये विक्री; पोर्न साईड, सोशल मीडियावर व्हायरल

Ashok Kharat Video Scandal: व्हिडिओ व्हायरल झाल्याने पीडित महिलांची ओळख उघड झाली असून त्यांना मानसिक धक्का बसल्याचे समोर आले आहे.

Roshan More

Ashok Kharat viral video explained: भोंदू अशोक खरात आणि महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियातून हटवण्यात येत आहे. एसआयटीच्या सायबर टीमेने तब्बल चार हजार पेक्षा अधिक लिंक्स सोशल मीडियावरून डिलिट केल्या आहेत.

मात्र, त्यापूर्वी या अशोक खरात पीडित महिलांच्या आक्षेपार्ह व्हिडिची विक्री अवघ्या 15 ते 20 रुपयांमध्ये केली जात असल्याचे उघड झाले आहे. 15 ते 17 अश्लील व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि पॉर्न साईट्सवर व्हायरल करण्यात आले होते. काही साईडवर हे व्हिडिओ पाहण्यासाठी 15 ते 50 रुपये आकारले जात होते.

या व्हिडिओंमुळे पीडित महिलांची ओळख उघड झाली असून त्यांना मानसिक धक्का बसल्याचे समोर आले आहे. आठ ते नऊ महिला मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार देखील घेत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांच्या विरोधात सायबर विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी सांगितले की, एसआयटीची 24 जणांची टीम आहे. त्यातील चार जण सायबर पथकात काम करत असून सोशल मीडियात येणारे व्हिडिओ लिंक्स डिलिट करत आहेत. 4 हजार 650 अश्लील लिंक्स डिलिट केल्या तर 6 जणांना अटक केली आहे. तसेच 400 हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायर करणारी अकाऊंट डिलिट करण्यात आली आहे.

गुन्हा दाखल, अटकही होणार

अशोक खरातचे आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करण्यांवर सायबर विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जर खरातच महिलांचे व्हिडिओ व्हायरल केले, शेअर केले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक देखील करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT