Ashok Kharat News: खरातनं अनेकांना कसं गंडवलं? कशी होती त्याची मोडस ऑपरेंडी? फेस, हॉट, कोल्ड' रीडिंगचा वापर

Ashok Kharat How He Cheated People: अशोक खरातकडे येणाऱ्या व्यक्तींची माहिती काढण्यासाठी त्यांने स्वतंत्र दोन पथक तयार केली होती. त्याची टीम संबधीत व्यक्तीची खासगी माहिती जमा करीत असे.
Ashok Kharat
Ashok Kharat Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News: गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर अशोक खरातच दिसतोय, त्यांचे नवीन कारनामे बघायला आणि वाचायला मिळत आहेत. पण सामान्यांच्या मनाल हा प्रश्न येतो की खरात नेमका कशा प्रकारे महिला, नेते, अधिकाऱ्यांना फसवायचा? याबाबत माहिती समोर आली आहे.

भोंदू अशोक खरात लोकांना कसा फसवायचा त्याची मोडस ऑपरेंडीच समोर आली आहे. खरातकडे येणाऱ्या व्यक्तींची माहिती काढण्यासाठी त्यांने स्वतंत्र दोन पथक तयार केले होते. भक्तांचे नाव, पत्ता कळल्यानंतर त्यांची टीम संबधीत व्यक्तीची खासगी माहिती जमा करीत असे. त्या माहितीच्या आधारे खरात आपल्यात दैवीशक्ती असल्याचे सांगत येणाऱ्या भक्तांना गंडा घालत होता.

Ashok Kharat
Ashok Kharat Case: सरकारी अधिकाऱ्यांच्या पत्नीदेखील खरातच्या जाळ्यात; 10 तास चौकशी, म्हणाला, '...केलेली कृती हा विधीचाच एक भाग'

त्यांच्याकडे येणाऱ्या व्यक्तींची माहिती संकलीत झाल्यानंतर खरात फेस रीडिंग, 'हॉट' आणि 'कोल्ड' रीडिंग, मानसशास्त्र या तंत्रांचा वापर करीत होता. नातेवाईकांकडून गुप्त माहिती मिळवायचा. त्या आधारापहिल्या 5 मिनिटांत येणाऱ्या व्यक्तीचा विश्वास संपादन करायचा. अशाच पद्धतीने त्यांने अनेकांना लाखो रुपयांचा चुना लावला. तर काही महिला, युवतीचे शारीरिक शोषण केले.

Ashok Kharat
Ashok Kharat Case: खरातचा फास आवळण्यास सुरवात! चाकणकरही सदस्य असलेल्या ट्रस्टवर SIT ची मोठी कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांनीही दिला आदेश

हॉट-कोल्ड रीडिंग म्हणजे काय?

हॉट रीडिंगमध्ये आधीच माहिती जमा केली जाते, कोल्ड रीडिंगमध्ये पहिले काही प्रश्न विचारुन त्यावर अंदाज लावला जातो. मानसशास्त्र आणि फेस रीडिंगव्दारे त्यांने अनेकांची फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे.

'कॅनडा कॉर्नर'

खरातच्या त्याच्या 'कॅनडा कॉर्नर' येथील कार्यालयात केवळ सामान्य महिलाच नाही, तर प्रशासनातील उच्चपदस्थ महिला अधिकारी आणि वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या पत्नींनाही लक्ष्य केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणातील काही पीडितांना विश्वासात घेतल्यानंतर त्यांचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत.

खरातची सखोल चौकशी एसआयटीचे पथक करीत आहे. त्यांचे कार्यालय, आणि बँक अकांउट सील करण्यात आले आहे. खरातचे महिलांसोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर फॉरवर्ड करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

Ashok Kharat
Rupali Chakankar News: महापालिका निवडणुकीत पराभव ते महिला आयोगाच्या अध्यक्षा; अशी आहे रुपाली चाकणकरांची राजकीय कुंडली

खरातचे वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या 6 ग्रुप ॲडमिन्सवर नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अधिकचा तपास सुरू आहे. नाशिक शहर सातपूर पोलीस ठाण्यात 6 जणांसह ग्रुप ॲडमिन्सवर गुन्हा दाखल झाला. ‘सिडको आणि सातपूर वॉलमन’ व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com