Ashok Kharat Case : अशोक खरातच्या 4 हजार 650 अश्लील लिंक, 6 जणांना अटक; तेजस्वी सातपुतेंनी स्पष्टच सांगितलं,'ते...'

Ashok Kharat obscene Video Tejasvi Satpute SIT : अशोक खरातचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पीडित महिलांना यामुळे मोठा मानसिक धक्का बसला आहे.
Police action intensifies in Ashok Kharat case after thousands of alleged obscene video links go viral.
Police action intensifies in Ashok Kharat case after thousands of alleged obscene video links go viral.Sarkarnama
Published on
Updated on

Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरात याच्या बाबातीत रोज नवेनवे खुलासे होत आहे. एसआयटीने त्याच्या भोवती फास आवळला असून तब्बल 30 जणांनी त्याच्या विरोधात साक्ष नोंदवली आहे. दरम्यान, खरातने योनी पुजेच्या नावाखाली महिलांवर लैंगिक अत्याचार केले. त्याचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियात व्हायर झाले आहेत.

एसआयटीच्या प्रमुख IPS तेजस्वी सातपुते यांनी सांगितले की, एसआयटीची स्थापना झाल्यानंतर आमच्या 24 जणांच्या टीममध्ये चार जणांची नियुक्ती ही सायबरमध्ये करण्यात आली. ती टीम सातत्याने सोशल मीडियावर टाकण्यात येणाऱ्या अश्लील लिंक हटवत होते. आत्तापर्यंत 4 हजार 650 लिंक्स सोशल प्लॅटफाॅर्मवरून डिलिट केल्या आहेत. व्डिहिओ व्हायरल केल्या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

ज्या सोशल अकाऊंटवरून हे व्हिडिओ व्हायर करण्यात आले आहेत. त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. 450 अकाऊंट देखील कायमस्वरुपी बंद करण्यात आले असून ते डिलिट करण्यात आले आहेत.

Police action intensifies in Ashok Kharat case after thousands of alleged obscene video links go viral.
Ashok Kharat Case: खरातच्या व्हायरल अश्लील व्हिडिओमुळे बदनामी...; पीडितेच्या कुटुंबीयांसमोर नवं संकट, केली 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी

महिलांना मानसिक धक्का

ज्या महिलांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यांना मानसिक धक्का बसल्याची माहिती आहे. 8 ते 9 महिलांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे रीतसर उपचार सुरू केले आहे. पीडितांची ओळख समोर येऊ नये म्हणून काळजी घेतली जात आहे. दरम्यान, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हे देखील दाखल करण्यात येत आहे.

ईडीची एन्टी

अशोक खरात प्रकरणात ईडीची देखील एन्ट्री झाली आहे. खरातने अनेकांची फसवणूक कोट्यवधीची संपत्ती जमा केली आहे. एसआयटीने खरातच्या संपत्तीची कागदपत्र ईडीला सुपूर्द केली आहे, असे सातपुते यांनी सांगितले.

Police action intensifies in Ashok Kharat case after thousands of alleged obscene video links go viral.
Nashik Crime News: खरातनंतर नाशकात आणखी एक मोठं कांड, टॅबमध्ये आढळले 200 अश्लील VIDEO, मोठा व्यावसायिक जाळ्यात

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com