SIT probe into Ashok Kharat scam: अघोरी विधी आणि अंधश्रद्धेच्या आडून महिलांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (SIT) जाहीर केलेल्या हेल्पलाईनवर अल्पावधीतच तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडत आहे. केवळ काही दिवसांतच 100 पेक्षा जास्त कॉल्स आले असून, अनेकांनी आपले अनुभव आणि फसवणुकीच्या घटना पोलिसांना सांगितल्या आहेत.
या तक्रारींमध्ये पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर परिसरातील नागरिकांचा मोठा सहभाग आहे. विशेष म्हणजे, अनेक महिलांनी पुढे येत खरातने केलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाबाबत गंभीर आरोप केले आहेत. अंधश्रद्धा, तंत्र-मंत्र आणि अघोरी पूजेच्या नावाखाली त्याने महिलांना जाळ्यात ओढल्याचे समोर येत आहे.
फसवणुकीचा प्रकारही तितकाच धक्कादायक आहे. खरात लोकांना चमत्कारी रत्न देण्याचे आमिष दाखवत असे. साधारण 50 रुपयांचे खडे तो 1 लाख ते 2 लाख रुपयांना विकत होता. लोकांच्या अडचणी दूर होतील, नशीब बदलेल असे सांगून त्याने शेकडो लोकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळले.
दरम्यान, महिलांकडून येणाऱ्या तक्रारींमुळे तपास अधिक वेगाने सुरू आहे. पोलिसांकडून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून, पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचबरोबर, खरातच्या आरोग्याबाबतही काही माहिती समोर आली आहे.
काही काळापूर्वी त्याला अर्धांगवायूचा झटका आला होता. शक्तिवर्धक औषधांच्या अति वापरामुळे त्याची प्रकृती बिघडल्याचा संशय आहे. खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले होते.
सध्या त्याच्या शरीराच्या एका भागाची हालचाल मर्यादित असल्याचे समजते. या संपूर्ण प्रकरणामुळे अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.