Mumbai News : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या अश्विनी बिंद्रे-गोरे हत्याकांडाचा निकाल नऊ वर्षानंतर आला आहे. पनवेल सत्र न्यायालयाने आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर इतर दोन आरोपींना सात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मात्र, ते सात वर्षे तुरुंगातच असल्याने त्यांची सुटका होणार आहे.
अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील राजू पाटील या आरोपीची यापूर्वीच पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मुख्य आरोपी कुरुंदकर याच्यासह महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी या तिघांना न्यायालयाने दोषी धरले होते. कुरुंदकरला जन्मठेपेसह 20 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर फळणीकर आणि भंडारी यांना सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. मात्र, त्यांची शिक्षा पूर्ण झाल्याने त्यांची तुरुंगातून सुटका होणार आहे.
अश्विनी बिंद्रे यांचे कळंबोली येथून 2016 मध्ये अपहरण करून हत्या करण्यात आली होती. राज्य सरकारने हत्येच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना केली होती. एसआयटीने 80 जणांची साक्ष घेत कुरुंदकर याच्यासह तिघांवर हत्येचा ठपका ठेवला होता. दिवंगत अश्विनी यांचे पती राजू गोरे आणि मुलगी सिद्धी यांनी नववर्ष केलेल्या संघर्षाला अखेर यश आले आहे
हातकलंगले तालुक्यातील आळते येथील अश्विनी बिद्रे यांचा हातकणंगले येथील राजू गोरे यांच्याशी 2005 मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर एका वर्षातच त्यांना MPSC च्या स्पर्धा परीक्षेत यश आले होते. तर त्या पोलीस उपनिरीक्षक बनल्या होत्या. 2006 मध्ये त्यांची पहिली पोस्टिंग पुण्यात झाली होती.
मुंबईतील कळंबोली येथेही नंतर त्यांची पोस्टिंग होती. त्यावेळी त्या सहाय्यक पोलीस निरीक्षक होत्या. अश्विनी बिद्रे आणि कुरुंदकर यांची पहिली भेट सांगलीत झाली होती. याच ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमसंबंधात झाले होते. याच्यातूनच बिद्रे आणि त्यांच्या कुटुंबात वाद निर्माण झाला होता. तसेच लग्नाच्या तकाद्यावरून कुरुंदकर यांच्याशीही बिद्रेंचा वाद झाला होता. याच वादातून अश्विनी बिद्रेंची हत्या झाल्याचे नंतर एसआयटी तपासात समोर आले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.