Mumbai News : भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची कन्या माजी खासदार पुनम महाजन गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या पक्ष संघटनेपासून दूर आहेत. यामुळे त्या नाराज असल्याची चर्चा भाजपमध्ये रंगली आहे. यासर्व मुद्यांवर पुनम महाजन यांनी स्पष्टपणे भाष्य केले.
मी निर्णय प्रक्रियेत सध्या नाही. त्याचे कारण देखील मला माहीत नाही, अशा शब्दात पुनम महाजन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुनम महाजन यांच्या या नाराजीची दखल भाजप पक्षाकडून कशी घेतली जाते, याकडे आता लक्ष लागलं आहे.
पुनम महाजन (Poonam Mahajan) म्हणाल्या, "मला पक्षाने दूर करेल किंवा मी पक्षाला दूर करेल, असे होणार नाही. गेली महिनाभर महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघात काम करत होते. पक्षातून एवढं प्रेम मिळत असताना परिवारापासून कोणीही दूर जात नाही. घरात गिले-शिकवे असतात".
"निर्णय प्रक्रियेत सध्या मी नाही. त्याचे कारण देखील मला माहीत नाही. मुंबईतील माजी खासदार असले, तरी ते निर्णय प्रक्रियेत असतात. मी नाही. नव्हते, या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही. या प्रश्नाचे उत्तर शोधायची मला गरज देखील वाटली नाही. काम वाढत गेले. त्यामुळे त्या निर्णय प्रक्रियेतील उंबरठ्यावरचे आत-बाहेरचे राजकारण करत बसायला विचार नाही", असे पुनम महाजन यांनी म्हटले.
भाजपमध्ये (BJP) इतर लोक आली. मूळ संघाचा कार्यकर्त्याला स्थान मिळत नाही, यावर पुनम महाजन म्हणाल्या, "पक्ष मोठा झाला. चेंबूरच्या दोन खोल्यातला पक्ष आता विशाल झाला आहे. वटवृक्ष झाला. राजकारण असं असते की, दुसऱ्या पक्षातील लोक येतात, जातात. त्यामुळे पक्षापासून कोणी दूर जाऊ शकत नाही". संघ विचार, परिवार हा आमचा आत्मा आहे. 'शरीर से आत्मा थोडी दूर जा सकती है', राजकारणात काही अनिवार्य गोष्टी असतात. पण भाजप असा पक्ष नाही की, पुढचा पुढे जाईल आणि मागचा मागे राहील. माझा पूर्ण विश्वास आहे की, ते असं काही माझ्याबाबत राहणार नाही, असेही पुनम महाजन यांनी म्हटलं.
वटवृक्षावर ज्यांनी घरटी केली, इतर पक्षातील आहे, या मुद्यावर बोलताना पुनम महाजन यांनी भाजपमध्ये मंत्री झालेले जुने कार्यकर्ते होते. पण थोडा रेषो वाढला आहे. 'ब्लॅक अॅण्ड व्हाईट' वाढला आहे. पण त्यात 'ग्रे-शेड' शोधत नाही. पक्षात पक्षासारखं वागावं. पक्षाच्या विचारसरणीसारखं वागावं. बाहरेच्यांनी तसं वागलं नाही, तर त्यांना स्थान नसावं, असे स्पष्ट करत पक्षाचे देखील तसेच म्हणणे आहे, असे भाष्य केले.
"पक्षाचा वटवृक्ष झाला आहे. त्यावर घरटे कोणाचे? वटवृक्षाच्या पारंब्या कुठपर्यंत पोचतात ते पाहू. परंतु वृक्षाला पाणी देणारे, त्या कार्यकर्त्यांना, गुरूंना विसरू नये, कारण ती आपली आत्मा आहेत. इतिहास विसरलो, तर वर्तमान ठिक दिसेल थोडासा. परंतु भविष्य खराब करू", असा टोला देखील पुनम महाजन यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.