Poonam Mahajan : भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या हत्येच्या कारणावर पुनम यांचा मोठा खुलासा

BJP leader Pramod Mahajan daughter ex MP Poonam Mahajan big claim regarding his murder : भाजपच्या माजी खासदार पुनम महाजन यांनी प्रमोद महाजन यांच्या हत्येसंदर्भात मोठा दावा केला आहे.
Poonam Mahajan
Poonam MahajanSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्यावरील हत्येवर त्यांची कन्या माजी खासदार पुनम महाजन यांनी मोठा खुलासा केला.

"प्रमोद यांच्या हत्येचे कारण कोर्टा सांगितले गेले आहे. बंदूकही माझ्या वडिलांची होती, गोळीही माझ्या वडिलांची होती. टिगर पाॅईंट, पैसा असू शकतो. त्याच्यापुढे जाऊन विचार येतो की, एवढं मोठं कांड करण्यामागे एक विचार मोठा असू शकतो", असा खळबळजनक दावा पुनम महाजन यांनी केला आहे.

पुनम महाजन (Poonam Mahajan) म्हणाल्या, "प्रमोद महाजन यांच्यावरील संकट हे मी कारण धरत नाही. मोठे नेते होते. नक्की. पंतप्रधान पदाचे दावेदार होते, हे मुलगी म्हणून सांगण्यापेक्षा पत्रकार आणि जनताच सांगत होते, हे देखील नक्की. तिसरी म्हणजे त्यांचे काम. तसेच एकमेव मराठवाड्यातील, महाराष्ट्रातील एकमेव मराठी माणूस. जो दिल्लीचे तख्त देखील हालवून शकत होता. ते प्रमोद महाजन होते. साहेब नव्हते. संघटनेवर प्रेम करणारे प्रमोद महाजन होते".

Poonam Mahajan
Shinde Vs Thackeray : महाआघाडीलाच तुमचा चेहरा चालत नाही, महाराष्ट्राला कसा चालेल?; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला

'देशातचे कितीतरी मुख्यमंत्री बनवलेले ते प्रमोदजी होते, असे सांगून प्रमोद यांच्यावर संकटामागे एक क्षुल्लक कारण समजले. परंतु एक छोटी गोष्ट एवढी टिगर होऊ शकत नाही. समोरच्या एवढी अक्कल नसेल, एका माणसाला नाही, तर एका विचाराला मारतोय. परंतु कुठे ना कुठे त्याच्या पुढेचे कारण होते. आता काय होते, राजकीय होते की, अराजकीय होते, हे आता मी सांगू शकत नाही', असेही पुनम महाजन म्हटल्या.

Poonam Mahajan
PM Modi Speech Dhule : एक है तो सेफ है, मोदींचा धुळ्यात नवा नारा ; भाषणातील 10 मुद्दे

एवढ्या मोठ्या कांडमागे मोठा विचार

प्रमोद महाजन यांच्यावरील संकट सांगताना, त्यामागील कारण सांगताना ते अजून ग्रे-एरियामध्ये आहे. सत्य हे पांढरं असते. मला तो प्रवास लांब वाटतो, असे सांगून क्षुल्लक कारण होते, ते पैशाचे कारण होते, तसे कोर्टात (Court) सांगितले गेले आहे, असे पुनम महाजन यांनी म्हटले. बंदूकही माझ्या वडिलांची होती, गोळीही माझ्या वडिलांची होती. टिगर पाॅईंट पैसा असू शकतो. त्याच्यापुढे जाऊन विचार येतो की, एवढं मोठं कांड करणे, त्यामागचा विचार मोठा असू शकतो, असेही पुनम महाजन यांनी म्हटले आहे.

प्रवीण महाजन यांच्यावरील प्रश्नाला उत्तर

प्रवीण महाजन हे संमोहीत होते? अशी चर्चा होत असते. यावर पुनम महाजन म्हणाल्या, "असे काही मला माहीत नाही. दोन वर्षापूर्वी यावर मी बोलले होते की, पहिल्यांदा यावर मला डिवचलं गेले होते. त्यावेळी मी राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यावर टिप्पणी केली होती. त्यावर माझ्या बापाचा कात्तील कौन? यावरून घाण घाण टिप्पण्या करणारे फलक माझ्या घरासमोर लावले गेले होते". एका घाणेरड्या विचारने माझ्या वडिलांना मारले होते. त्यामागे षडयंत्र आहे, यावर देखील भाष्य केले होते. प्रमोद यांच्या हत्येत षडयंत्र होते, असेच काहीसे आहे, असा उल्लेखही पुनम महाजन यांनी केला.

प्रमोद यांच्या हत्येवेळी पुनम महाजन कुठे होत्या?

पुनम यांच्या घरापासून काही अंतरावर प्रमोद महारान राहत होते. हत्येच्या दिवशी पुनम महाजन कोठे होत्या, या प्रश्नावर बोलताना पुनम महाजन म्हणाल्या, "मी यावर कोर्टात देखील भाष्य केले आहे. मुलीचे लग्न झाल्यावर बापाची इच्छा असते की, मुलीबरोबर जास्त वेळ घालवायचा. माझा मुलगा लहान होता. नागपूरमधून सुरक्षा यात्रा करून प्रमोद महाजन आले होते. मला फोन आला बाबा को गोळी लगी हैं. मला आठवत नाही की नेमकं त्या क्षणी काय झालं. मी तशीच निघाले. मला काहीच आठवत नाही. कशी होते? काय होते? माझ्या मुलाल कोठे ठेवले होते? कशी धावत गेले? हे, हिंदुजामधील ते बारा दिवस? परंतु नियतीला वेगळेच मान्य असावे. मला वाटते की, देशाला आणि संघटनेला प्रमोदजी यांची गरज होती. झालं ते वाईट झालं".

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com