Sanjay Raut Sarkarnama
महाराष्ट्र

Sanjay Raut : हुकुमशाहाविरोधात तुरुंगात गेलोय; संजय राऊत लिहित आहेत पुस्तक, नाव देखील सांगितलं

Shivsena UBT News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत लिहित असलेल्या पुस्तकाचे नाव त्यांनी सांगितले.

Pradeep Pendhare

Mumbai News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत लिहित असलेल्या पुस्तकाचे नाव सांगितलं आहे. राज्यातील प्रमुख पक्षाचा नेता आणि दिल्लीतील खासदार म्हणून काम करताना दिल्लीतील हुकुमशाहाविरोधात लढत आहे, म्हणून मी तुरुंगात गेलो.

'आता पुस्तक लिहित आहे, माझे अनुभव वेगळे आहेत. पुस्तकाचे काम 90 टक्के पूर्ण झालं असून, माझ्या पुस्तकाचे नाव आहे 'नरकातली स्वर्ग', असे संजय राऊत यांनी सांगितले.

शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत यांनी सकाळी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी लिहित असलेल्या पुस्तकाचे नाव सांगितले. खासदार संजय राऊत पुस्तक लिहित असून, त्यात काय काय खुलासे, किस्से, घटना असतील, याची उत्सुकता असणार आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लिहिलेल्या 'डायरी ऑफ होम मिनिस्टर' या पुस्तक अप्रतिम असून, त्याचे कौतुक देखील संजय राऊत यांनी केले.

संजय राऊत म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार अनिल देशमुखांनी (NCP) लिहिलेले पुस्तक पाहिलय आणि वाचलं देखील आहे. परंतु त्यांच्या आणि माझ्यातील अनुभवानांमध्ये फरक आहे. ते राज्याचे गृहमंत्री होते. मी राज्यातील एका प्रमुख पक्षाचा नेता म्हणून काम करतो. तसंच दिल्लीतील हुकुमशाहीविरोधात लढतोय, या विरोधामुळे मला अटक झाली".

'प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात. त्यांचे अनुभव वेगळे आहे आणि माझे अनुभव वेगळे आहेत. त्यांचे पुस्तक अप्रतिम आहे. 'डायरी ऑफ होम मिनिस्टर', असे त्यांच्या पुस्तकाचे नाव आहे. माझ्या पुस्तकाचे नावे 'नरकातला स्वर्ग' आहे', असे संजय राऊत यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT