Mumbai News : विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून भाजप आणि त्यानंतर शिवसेनेने उमेदवारांची यादी जाहीर केली. परंतु अजित पवार यांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. आता अजित पवार यांच्या उमेदवारांच्या यादीकडे लक्ष लागलं आहे.
अजित पवार यांच्याकडून 40 उमेदवारांना 'AB' फॉर्म देण्यात आले आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांची कन्या सना मलिक यांना 'AB' फॉर्म देण्यात आला आहे. बापाच्या अगोदर मुलीला 'AB' फॉर्म मिळाल्याने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात चर्चेचा विषय ठरला आहे.
नवाब मलिक अणुशक्तीनगरमधील विद्यमान आमदार आहेत. हा मतदारसंघ त्यांनी आपली मुलगी सना यांना सोडला आहे. नवाब मलिक आता स्वतः मानखुर्द-शिवाजीनगर येथून लढण्याची तयारी करत आङेत. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीकडूनच त्यांना उमेदवारी मिळेल, असे सांगितले जात आहे.
आमदार नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपचा (BJP) विरोध आहे. कुख्यात गुंड दाऊद यांच्याशी व्यवहारीक संबंध असल्याचा आरोप नवाब मलिक यांच्यावर आहे. तुरुंगात गेले आहेत. देशद्राही संबंध असल्यांना पक्ष घेऊ नका, असा इशारा भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीमधील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला दिला. मलिक तुरुंगातून जाऊन आल्यानंतर ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाले. भाजपचा अजूनही नवाब मलिक यांना विरोध आहे.
नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांना अजित पवार यांच्या पक्षाकडून 'AB' फॉर्म देण्यात आला आहे. परंतु नवाब मलिक देखील निवडणूक लढवणार असल्याची आता चर्चा सुरू आहे. परंतु अजित पवार यांनी त्यांना 'AB' फॉर्म न देऊन वेटिंगवर ठेवले आहे.
अजित पवार यांना त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आतापर्यंत 40 उमेदवारांना 'AB' फॉर्म दिले आहेत. जे लांबचे उमेदवार आहे, त्यांना आम्ही'AB' फॉर्म दिले आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.