Mumbai News : महाविकास आघाडीत '85-85-85', असा फॉर्म्युला ठरलेला असताना, काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेस राज्यात किती जागा लढवणार, याचा आकडा नव्याने सांगितला आहे. यामुळे महाविकास आघाडीत तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
"पक्ष श्रेष्ठींशी सर्व जागांवर चर्चा करणार असून, काँग्रेस राज्यात '100' च्यावर जागा लढेल. जागांवरची नावे आम्ही पक्षश्रेष्ठींना देणार आहोत" असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी आपल्या पहिल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने 65, काँग्रेस 48 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने 38 पहिल्या यादीतून उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडीने आतापर्यंत एकूण 181 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. महायुतीने (Mahatyuti) 182 उमेदवार जाहीर केलेत.
विजय वडेट्टीवार म्हणाले, "काँग्रेसची (Congress) दुसरी यादी तयार आहेत. ती आज रात्री किंवा उद्या सकाळी जाहीर होईल. महाविकास आघाडीत जागा वाटपाचा कोणताही तिढा नाही". आम्ही विढा खाल्ला आहे. जेवण झाल्यावर विढा खाल्ला जातो तो विडा, आम्ही तिघांनी खाल्ला आहे, अशी मिश्किल टिप्पणी देखील वडेट्टीवार यांनी केली.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लोकसभेला काँग्रेस विरोधात काम करणाऱ्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे काहींची नाराजी आहे. ती दूर करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. दोन्ही पक्षांत नाराजी असूच शकते. सर्वांच्या मनासारखं होत नसतं असे सांगून जागा वाटपाचं विजय वडेट्टीवार यांनी गणित सांगितलं.
दोन भावांमध्ये 10 एकर जागा आहे. त्यापैकी पाच-पाच एकर येत होती. पण आता तिसरा भाऊ आला आहे. त्यामुळे एकाला चार एकर आणि दोघांना 3-3 एकर मिळेल. 4 एकर कोणाला मिळणार हे लवकरच कळेल, असे सांगून जागा वाटपाची उत्सुकता अधिकच वाढवली.
'10 एकरात काही जागा शिल्लक ठेवलीय, त्यात मित्रपक्षांना संधी देवू. त्यात त्यांना उत्तम शेती करता येईल असे सांगून विदर्भात काँग्रेस 43 जागा लढवणार आहे. विदर्भातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून तोडगा काढत आहोत', असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं. घराणेशाही काय फक्त आमच्याकडेच आहे का? भाजपची यादी पाहा. मग समजेल काय आहे ते, असे सांगून घराणेशाहीचा विषय विजय वडेट्टीवार यांनी एका वाक्यात संपवला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.