Maharashtra Assembly Elections : लोकसभेप्रमाणेच 'या' जिल्ह्यात उमेदवारांबाबत सस्पेन्स कायम...

Confusion over nominations in Mahayuti and MVA in four assembly constituencies in Dharashiv : धाराशिव जिल्ह्यातील काही मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली असताना काही मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार, हेही स्पष्ट झालेले नाही. लोकसभा निवडणुकीतही धाराशिव (उस्मानाबाद) मतदारसंघात अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.
Mahayuti and MVA
Mahayuti and MVASarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News :विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. पुढच्या याद्याही एक-दोन दिवसांत येण्याची शक्यता आहे.

धाराशिव जिल्ह्यात महायुतीचे तीन आणि महाविकास आघाडीचे दोन उमदेवार जाहीर झाले आहे. अन्य उमेदवारांबाबत सस्पेन्स कायम आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराबाबत असाच सस्पेन्स अनेक दिवस कायम होता.

लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने शिवसेना (Shiv Sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबळकर यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यांनी प्रचारही सुरू केला होता, मात्र महायुतीत उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार, हे निश्चित होत नव्हते. सुरवातीला सेवानिवृत्त सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांचे नाव भाजपक़डून चर्चेत आले. नंतर पालकमंत्री सावंत यांनी या जागेवर शिवसेनेचा दावा सांगितला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनीही तयारी सुरू केली होती. मात्र उमेदवारी मिळाली ती भाजपचे तुळजापूरचे आमदार राणजगजतिसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांना.

Mahayuti and MVA
Pune Politics: महायुती-आघाडीची डोकेदुखी वाढणार; 'या' मतदारसंघात दोन राष्ट्रवादी अन् दोन शिवसेनेमध्येच लढत रंगणार?

धाराशिव जिल्ह्यात विधानसभेचे चार मतदारसंघ आहेत. धाराशिव - कळंब मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विद्यमान आमदार कैलास पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. हा मतदारसंघ महायुतीत कोणाच्या वाट्याला जाणार, हे निश्चित झालेले नाही. महायुतीतील (Mahayuti) तिन्ही पक्षांनी या मतदारसंघावर दावा केला आहे. भाजपचे कळंब तालुकाप्रमुख अजित पिंगळे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे, शिवेसेनेकडून शिवाजी कापसे हे इच्छुक आहेत. मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार आणि उमेदवारी कोणाला मिळणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाला आहे.

Mahayuti and MVA
Maharashtra Assembly Election : एक लाखांपेक्षा अधिक मताधिक्य घेतलेले आमदार, एका क्लिकवर...

भूम, परंडा विधानसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला सर्वाधिक 81 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. हा मतदारसंघ पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचा आहे. शिवसेनेने त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटला आहे. या पक्षाकडून माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील इच्छुक होते. काही दिवसांपूर्वीच त्यांचे निधन झाले आहे. त्यामुळे त्यांचे पुत्र रणजित पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. या मतदारसंघातून तीनवेळा विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार राहुले मोटे हे प्रबळ दावेदार मानले जात होते.

तुळजापूरमध्ये 'मविआ'त पेच

तुळजापूर मतदारसंघातून भाजपने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. हा मतदारसंघ महाविकास आघाडीत कोणाला सुटणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तुळजापूरवर भगवा फडकावण्याचे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटावा, यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. काँग्रेसकडून माजीमंत्री मधुकरराव चव्हाण, जिल्हाध्यक्ष धीरज पाटील हे इच्छुक आहेत. गेल्यावेळी वंचित बहुजन आघाडीकडून लढलेले अशोक जगदाळे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक आहे.

उमरगा-लोहारा 'मविआ'मध्ये सस्पेन्स

उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेने आमदार ज्ञानराज चौगुले यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 2009 मध्ये हा मतदारसंघ राखीव झाला. त्यानंतर सलग तीनवेळा आमादार चौगुले निवडून आले आहेत. ते चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीचा चेहरा कोण असेल, याबाबत सस्पेन्स निर्माण झाला आहे. हा मतदारसंघ काँग्रेसला की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. महाविकास आघाडीकडून लढण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com