Assembly Election Exit Poll Sarkarnama
महाराष्ट्र

Assembly Election Exit Poll : सर्वाधिक जागा भाजपला, युती की आघाडीची सत्ता? एक्झिट पोलने कुणाचं वाढवलं टेन्शन?

Electoral Edge Mahayuti Mahavikas Aghadi BJP Congress NCP Shiv Sena : राज्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विविध संस्थांचे एक्झिट पोल येण्यास सुरूवात झाली आहे.

Rajanand More

Mumbai : महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार, याचा निकाल २३ नोव्हेंबरला लागणार असला तरी मतदानानंतरचे अंदाज आता समोर आले आहे. विविध संस्थांच्या एक्झिट पोल जाहीर होत असून इलेक्ट्रोरल एज या संस्थेनेच्या पोलनुसार राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येताना दिसत आहे. आघाडीला १५० जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  

इलेक्टोरल एजच्या एक्झिट पोलनुसार राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो. भाजपला ७८ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यापाठोपाठ काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरेल. काँग्रेसला ६० जागा मिळण्याची शक्यता आहे.

पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांमध्ये कोण आघाडी घेणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. एक्झिट पोलनुसार शरद पवार आणि उद्धव ठाकरे यामध्ये आघाडी घेताना दिसत आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ४६ जागांवर विजय मिळेल, असा कल वर्तवण्यात आला आहे.

उध्दव ठाकरे यांची शिवसेना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेपेक्षा वरचढ ठरू शकते, असाही अंदाज आहे. ठाकरेंना ४४ तर शिंदेंना केवळ २६ जागा मिळतील, असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १४ जागांसह सहाव्या क्रमांकावर राहील, अशी शक्यता आहे.

एक्झिट पोलची आकडेवारी –

भाजप – ७८

काँग्रेस – ६०

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) – ४६

शिवसेना (उद्धव ठाकरे) – ४४

शिवसेना – २६

राष्ट्रवादी काँग्रेस – १४

इतर – २०   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT