Maharashtra Vidhan Sabha Election: राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीकडून 38 उमेदवारांची तर, शिवसेनेकडून 45 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपने आपल्या पहिल्या उमेदवार यादीत 13 महिला उमेदवारांना स्थान दिले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून चार महिलांना उमेदवारी घोषित करण्यात आली.
श्रीवर्धनच्या विद्यमान आमदार आदिती तटकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तर, देवळाली मतदारसंघाच्या विद्यमान आमदार सरोज आहिरे तसेच पाथरी मतदारसंघातून निर्मला विटेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल्या आमदार सुलभा खोडके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांना देखील अमरावती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
शिवसेनेकडून 45 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये साक्री मतदारसंघातून मंजुळाताई गावीत, जोगेश्वरी मतदारसंघातून मनीषा वायकर, भायखळा मतदारसंघातून यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.