Ramdas Athawale Sarkarnama
महाराष्ट्र

Ramdas Athawale : 'मी मंत्री झालोय राज ठाकरे पक्ष बंद करा', रामदास आठवलेंचा टोला

Ramdas Athawale Criticized raj Thackeray : रामदास आठवले म्हणाले, राज ठाकरे एका पक्षाचे नेते आहेत. मी त्यांच्या विरोधात कधी बोलत नाही. माझ्यासारखा माणूस त्यांच्या पक्षात जाणार नाही.

Roshan More

Ramdas Athawale : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या एका मुलाखतीमध्ये मला रामदास आठवलेंसारखे मंत्री व्हायचे असते तर मी माझा पक्ष बंद केला असता असे म्हटले होते. त्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

'मी पँथर कालपासून संघर्ष केला आहे त्यामुळे मला मंत्रिपद मिळाल आहे. आता मी मंत्री झालोय तर राज ठाकरे यांनी त्यांचा पक्ष बंद करावा', असा टोला रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना लगावला.

रामदास आठवले म्हणाले, राज ठाकरे एका पक्षाचे नेते आहेत. मी त्यांच्या विरोधात कधी बोलत नाही. माझ्यासारखा माणूस त्यांच्या पक्षात जाणार नाही. महायुती आणि महाविकास आघाडी असा संघर्ष असला तरी ही निवडणूक महायुतीसाठी अत्यंत सोपी आहे.

महायुती 170 जागा जिंकेल

लोकसभेला महाराष्ट्रात नरेटीव्हमुळे आमचे मोठे नुकसान झाले.तरी लोकसभेला आम्हाला झालेले मतदान हे मोठे आहे. या मतदानामध्ये आमच्या मतदानाचा देखील वाटा आहे.महायुती विधानसभेला 170 पर्यंत जागा मिळतील, असा दावा रामदास आठवले यांनी केला.

कार्यकर्त्यांची नाराजी दूर

महायुतीमध्ये आरपीआयला फक्त एकच जागा मिळाली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमधे नाराजी होती मात्र मी ती दूर केली आहे. विधानसभेला जारी एक जागा असेल तरी आम्हाला एक विधानपरिषद आणि सत्ता आल्यावर मंत्रिपद देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे, असे रामदास आठवले यांनी सांगितले.

अरविंद सावंतांवर कारवाई करा

एकनाथ शिंदे यांच्या उमेदवार शायना एन सी यांच्याविरोधात अपशब्द वापरणाऱ्या खासदार अरविंद सावंत यांच्यावर उद्धव ठाकरेंनी कारवाई करावी, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. शायना एन सी यांना माल म्हणणे ही गंभीर बाब आहे. त्यांचा अपमान म्हणजे सगळ्या महिलांचा अपमान आहे.महिला आयोगाने देखील याची दखल घेऊन यावर कारवाई करावी असे रामदास आठवले म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT