By-elections for Baramati and Rahuri in Maharashtra are set for April 23. The Model Code of Conduct is now in effect. Sarkarnama
महाराष्ट्र

Byelection Maharashtra : महाराष्ट्रातील दोन विधानसभा मतदारसंघातील नव्या शासकीय कामांना ब्रेक; खासदार, आमदारांनाही फटका

Byelection Maharashtra : निवडणूक आयोगाने ५ राज्यांच्या निवडणुकांसह बारामती व राहुरी पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. २३ एप्रिलला मतदान तर ४ मे रोजी निकाल लागणार असून, आचारसंहितेमुळे विकासनिधी खर्चावर निर्बंध आले आहेत.

Hrishikesh Nalagune

Maharashtra Assembly Byelection : केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची आणि 6 राज्यातील 8 विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची घोषणा केली. या निवडणुकांची घोषणा होताच केंद्रीय निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे.

त्यानुसार खासदार, आमदार आणि विधानपरिषद सदस्यांच्या स्थानिक विकास निधीच्या खर्चावर निवडणूक आयोगाने निर्बंध लागू केले आहेत. आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नवीन निधी मंजूर किंवा वितरित करता येणार नाही. आचारसंहितेपूर्वी कामाचा आदेश दिला असल्यास आणि प्रत्यक्ष काम सुरू झाले नसल्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच ते सुरू करता येईल, असेही आयोगाने स्पष्ट केले.

केंद्रीय निवडणूक आयोगाने काल जारी केलेल्या आदेशात आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच पुदुच्चेरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय जाहीर केला. याशिवाय काही राज्यांतील विधानसभा मतदारसंघांमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकांचीही घोषणा झाली आहे.

यासोबतच, महाराष्ट्रातील राहुरी आणि बारामती, गोव्यातील फोंडा, गुजरातमधील उमरेठ, कर्नाटकमधील बागलकोट व दावणगेरे दक्षिण, नागालँडमधील कोरिडांग (अनुसूचित जमाती) तसेच त्रिपुरातील धर्मनगर विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. या पाच राज्यांमध्ये संपूर्णतः तर 6 राज्यांमध्ये संबंधित विधानसभा मतदारसंघापुरती आचारसंहिता लागू झाली आहे.

नेत्यांचे निधन :

बारामतीजवळील विमान अपघातात 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. तर माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचे 17 ॲाक्टोबर 2025 रोजी निधन झाले होते. या दोन्ही नेत्यांचे अकाली निधन झाल्यामुळे बारामती, राहुरी या दोन जागा रिक्त आहेत. विधानसभा सदस्याच्या निधनानंतर सहा महिन्याच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे या दोन ठिकाणच्या पोटनिवडणुकीची घोषणा झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT