Maharashtra assembly bypolls update : बारामती, राहुरी पोटनिवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच सीएम फडणवीसांचे मोठे विधान; म्हणाले,'निवडणूक लादली तर ....'

Baramati,Rahuri by-election News : पाच राज्यासह महाराष्ट्रातील विधानसभेच्या बारामती, राहुरी या दोन जागा रिक्त आहेत. या दोन जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणाही होऊ शकते. त्याकडे लक्ष लागले असतानाच या पोटनिवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच सीएम देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे.
Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis
Maharashtra Chief Minister Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Pune News : निवडणूक आयोग रविवारी दुपारी चार वाजता नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेत आहे. यावेळी आसाम, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात येणार आहे. या पाच राज्यासह महाराष्ट्रातील विधानसभेच्या बारामती, राहुरी या दोन जागा रिक्त आहेत. या दोन जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणाही होऊ शकते. त्याकडे लक्ष लागले असतानाच या पोटनिवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच सीएम देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे.

अहिल्यानगर जिल्हयात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस आले होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधला. बारामती, राहुरी पोटनिवडणुकीची घोषणा होणार असतानाच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. त्यानंतरही निवडणूक लादली तर आमची लढण्याची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis
BJP operation Lotus : भाजपच्या ऑपरेशन लोटसला धक्का! दाव लावलेले तिन्ही मोठे मोहरे पहिल्याच परीक्षेत फेल...

बारामतीजवळील विमान अपघातात 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार यांचे अपघाती निधन झाले. तर माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचे 17 ॲाक्टोबर 2025 रोजी निधन झाले होते. या दोन्ही नेत्यांचे अकाली निधन झाल्यामुळे बारामती, राहुरी या दोन जागा रिक्त आहेत. विधानसभा सदस्याच्या निधनानंतर सहा महिन्याच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे या दोन ठिकाणच्या पोटनिवडणुकीची घोषणा रविवारी होत असेलल्या पत्रकार परिषदेत होऊ शकते.

Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis
Free Electricity for Farmers : शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! दिवसा 12 तास मोफत वीजपुरवठा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा 39 वा पदवीदान समारंभ रविवारी पार पडला. राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, कृषीमंत्री दत्ता भरणे, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदींची या कार्यक्रमासाठी उपस्थिती होती. सीएम देवेंद्र फडणवीस यांचा महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी देवून होणार सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमानंतर सीएम फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis
Saptashrungi Devi Trust : सप्तशृंगी देवी ट्रस्टला हायकोर्टाचा दणका, नवनियुक्त विश्वस्तांच्या आनंदावर दोनच दिवसात विरजन

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com