West Bengal Election 2026: TMCनं एकाच वेळी जाहीर केले सर्व उमेदवार! CM ममता बॅनर्जी 'या' जागेवरुन लढणार; भाजपला चेकमेट करणार?

West Bengal Election 2026: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली असून भाजपनं काल उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर आज तृणमूल काँग्रेसची यादी जाहीर झाली आहे.
west bengal cm mamata banerjee will contest election from ...
west bengal cm mamata banerjee will contest election from ...
Published on
Updated on

West Bengal Election 2026: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीची नुकतीच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपनं आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर आज सत्ताधारी तृणमूल काँग्रेसनं सर्वच २९४ जागांवरील उमेदवरांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये दोन महत्वाच्या मतदारसंघांवर ममतांनी विशेष लक्ष केंद्रीत केलं आहे. यांपैकी एका मतदारसंघातून खुद्द ममता बॅनर्जी निवडणूक लढवणार आहेत.

पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भाजपनं आधीच ममतांना चेकमेट करण्यासाठी एकच तगडा उमेदवार या दोन्ही जागांवर उतरवला आहे. पण ममतांनी सर्वच्या सर्व उमेदवार एकावेळी जाहीर केल्यानं भाजपलाच चेकमेट करण्याचं पाऊल टाकल्याचं बोललं जात आहे.

west bengal cm mamata banerjee will contest election from ...
Beed Hostel Scam: बीडमध्ये वसतिगृह घोटाळ्याचा पर्दाफाश! मुख्याध्यापकानं विद्यार्थ्यांचा...; काय आहे प्रकरण?

ममतांच्या विरोधात कोण?

ममता बॅनर्जी या आपल्या पारंपारिक भवानीपूर या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर भाजपतून तृणमूलमध्ये आलेल्या पवित्र कर यांना नंदीग्राममधून उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडं ममतादीदी लढत आलेल्या भवानीपूर अन् पवित्र कर उमेदवार असलेल्या नंदीग्राम या दोन्ही मतदारसंघातून भाजपनं सुवेंदू अधिकारी यांना उमेदवारी दिली आहे. गेल्यावेळी नंदीग्राममधून ममतांचा पराभव झाला होता. पण तरीही राज्यात बहुमताचा आकडा गाठल्यानं ममता बॅनर्जी यांनी भवानीपूरमधून पोटनिवडणूक लढवत आपलं मुख्यंमत्रीपद शाबूत ठेवलं होतं.

west bengal cm mamata banerjee will contest election from ...
Karnataka Assembly Session : अधिवेशन सुरू असतानाच अध्यक्षांच्या नाराजीचा स्फोट; मंत्र्यांकडून उत्तर न मिळाल्याने सभागृहातून वॉकआउट अन् निलंबनाचा आदेश

तृणमूलच्या पहिल्याच यादीत महिलांना प्राधान्य

तृणमूल काँग्रेसनं जाहीर केलेल्या पहिल्याच यादीत तब्बल ५२ महिलांना तिकीटं देण्यात आली आहेत. यामध्ये खेळाडू स्वप्ना बर्मन यांना राजगंज (जलपाईगुडी) इथून उमेदवारी देण्यात आली आहे. तर आयपीएसअधिकारी प्रसून बॅनर्जी यांना चाचोल इथून तर माजी आयपीएस हुमांयू कबीर यांना दोमकोल इथून, अशोकनगरमधून ज्योती प्रिया मौलिक, मदन मित्रा बरननगरमधून उमेदवारी, तर हिंगलगंज इथून मौहम्मद तौसीफ रहमान यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

west bengal cm mamata banerjee will contest election from ...
Beed worker scam : सुरेश धसांनी अधिवेशन काळातच टाकला नवा बॉम्ब, बीडमध्ये उडाली खळबळ; प्रशासन हादरवणारी महाघोटाळ्याची 'ती' शंभर प्रकरणं समोर

निवडणूक आयोगावर आगपाखड

दरम्यान, आपल्या पक्षाची उमेदवार यादी जाहीर करण्यापूर्वी ममतांनी निवडणूक आयोगावर अनेक आरोप केले. त्यांनी म्हटलं की, भाजपच्यावतीनं चांगला खेळ खेळला जातोय. त्यांना थेट भाजपसाठी प्रचार करायला हवा. भाजपच्या तालावर नाचणाऱ्या निवडणूक आयोगाकडून अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ईदच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. याद्वारे बंगालच्या निवडणुकीपूर्वी पहिल्यांदा दंगल भडकावणे हा त्यांचा इरादा होता.

west bengal cm mamata banerjee will contest election from ...
Maharashtra Politic's : शिंदेंपाठोपाठ मुख्यमंत्री फडणवीसही दिल्ली दौऱ्यावर; राजकीय चर्चांना उधाण

२९१ जागांवर दिले उमेदवार

तृणमूल काँग्रेसकडून सर्वच्या सर्व २९४ जागांवरील उमेदवार जाहीर केलेले असले तरी यांपैकी ३ जागा या भारतीय गोरखा प्रजातांत्रिक मोर्चा नामक पक्षाला सोडल्या आहेत. त्यामुळं एकाच वेळी ममता बॅनर्जी यांनी सर्वच्या सर्व जागांवरील उमेदवार घोषीत करुन आपण निवडणुकीसाठी आधीच तयारीत असल्याचं दाखवून दिलं आहे. यानंतर आता भाजपकडून उर्वरित जागांवरील उमेदवार जाहीर करण्यासाठी दबाव वाढणार आहे. पण केवळ एकाच मित्रपक्षाला सोबत घेऊन तृणमूल काँग्रेस यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. या ठिकाणी काँग्रेस स्वतंत्ररित्या निवडणूक लढवणार आहे.

४ मे ला निकाल

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात पार पडणार असून २३ एप्रिलला १५२ मतदारसंघांसाठी तर २९ एप्रिलला १४२ मतदारसंघांसाठी अशा दोन दिवशी इथं मतदान होणार आहे. तर ४ मे रोजी इथं मतमोजणी पार पडणार असून याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com