Sharad Pawar, Uddhav Thackeray, Devendra Fadnavis, Ekanath Shinde  Sarakranama
महाराष्ट्र

Assembly Elections Sakal Survey: मुख्यमंत्रीपदासाठी कुणाला पसंती ? उद्धव ठाकरे, फडणवीसांना सारखेच वेटेज

Sachin Waghmare

Sakal Survey 2024, : सकाळ आणि साम टिव्हीच्या माध्यमातून 'कल महाराष्ट्राचा' या 288 मतदारसंघाचा सर्व्हे करण्यात आला. राज्याचा मुख्यमंत्री कोण हवा, विधानसभेवर महायुती झेंडा फडकवणार का, की महायुतीचीच सत्ता राहणार, मतदारांची कुठल्या राजकीय पक्षाला पसंती आहे, या व अशा अनेक प्रश्नांचा आढावा या सर्व्हेमध्ये घेण्यात आला. राज्याच्या 288 मतदारसंघातल्या 84 हजार 529 मतदारांनी या सर्व्हेमध्ये भाग घेतला होता.

सर्व्हेमध्ये भाग घेतलेल्या या मतदारांच्या कलानुसार पूर्वीच्या युतीला पसंती दिल्याचे चित्र यामध्ये दिसत आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी 2024 च्या निवडणुकीत आपण कोणाला पसंती द्याल, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानुसार मतदारांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना 22.4 टक्के मतदारांनी पसंती दर्शवली तर त्यांच्या इतकीच पसंती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना 22.4 टक्के मतदारांनी पसंती दिली. त्यामुळे राज्यातील जनतेने फडणवीस, ठाकरेंना जवळपास समान पसंती दर्शवली आहे. (Assembly Elections Sakal Survey news )

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 14.5 टक्के नागरीकांनी पसंती दर्शवली. त्यांना फडणवीस, ठाकरेंच्या तुलनेत जवळपास 10 टक्के मतदारानी कमी पसंती दर्शवली आहे. त्यामुळे नागरिकांनी पूर्वीच्या भाजप व ठाकरे सेनेच्या युतीला पसंती दर्शवीत सर्वांनाच बुचकाळ्यात टाकले आहे. विशेषतः यामध्ये उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून फडणवीस यांच्या बरोबरीने मतदारांनी पसंती दर्शवली.

महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांना सर्वाधिक पसंती मिळाली आहे. तर महायुतीमध्ये फडणवीस यांना सर्वाधिक पसंती दर्शवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंना या सर्व्हेत 6.8 टक्के नागरिकांनी पसंती दर्शवली आहे तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना 5.3 टक्के नागरिकांनी पसंती दर्शवली आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांना 4.7 टक्के नागरिकांनी पसंती दर्शवली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayanat Patil) यांना 3.6 टक्के मतदारांनी पसंती दर्शवली आहे. तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांना 0.9 टक्के नागरिकांनी पसंती दर्शवली तर 4.8 टक्के मतदारांनी याशिवाय इतरांना पसंती दर्शवली. त्याशिवाय 10.2 टक्के मतदारांनी सांगता येत नसल्याचे स्पष्ट केले .

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT