Ambadas Danve On Aurangzeb Sarkarnama
महाराष्ट्र

Ambadas Danve On Aurangzeb : छत्रपतींचा आशीर्वाद घोषणा देत सत्तेवर आले, अन् शंभुराजांच्या मारेकऱ्याच्या कबरीला सरंक्षण देतायेत!

Aurangzeb's tomb has been protected with a metal shed and high fencing, sparking criticism from Ambadas Danve against the government. : केंद्र सरकारच्या भारतीय पुरातत्त्व विभागाने आपल्या पातळीवर कबरीची सुरक्षा वाढवत या भोवती उंच असे पत्र्याचे शेड आणि त्यावर तारांचे कुंपण लावण्याची तयारी सुरू केली आहे.

Jagdish Pansare

Shiv sena UBT News : छत्रपतींचा आशीर्वाद अशा घोषणा देत दिल्लीत आणि राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपाने त्यांचेच पुत्र शंभूराजांच्या मारेकऱ्यांच्या कबरीला संरक्षण दिले आहे. संभाजीनगर जवळच्या खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीला प्रचंड अशी सुरक्षा देण्यात आली असून मोठे पत्र्याचे शेड आणि त्यावर तीन फुटी तारांचे कुंपण करून ही कबर सुरक्षित ठेवण्यात येणार आहे.

शंभूराजांच्या मारेकऱ्याभोवती जणू सरकारने किल्लाच उभा केला आहे, आता फक्त लष्कर लावायचं बाकी राहिलं आहे असा, टोला विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केंद्र आणि राज्य सरकारला लगावला. गेल्या काही दिवसांपासून राज्यात औरंगजेबाची कबर उखडून फेकण्याची मागणी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल अशा विविध संघटनांनी केली आहे. त्यासाठी अगदी रस्त्यावर उतरण्याची किंवा अयोध्येत राम जन्मभूमीसाठी करण्यात आलेल्या कारसेवेसारखी तयारी असल्याचा इशाराही दिला आहे.

दरम्यान औरंगजेबाच्या कबरीमुळे राज्यातील वातावरण व कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. नागपुरात झालेल्या दंगलीने राज्यात कोणत्याही क्षणी काहीही घडू शकते याची प्रचिती आली आहे. (Shiv sena) अशावेळी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पुरातत्त्व विभागाकडून खबरदारीचा उपाय म्हणून औरंगजेबाच्या कबरीला पुरेसे संरक्षण आणि पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी नुकतीच कबरीची पाहणी करून प्रशासनाला योग्य सूचना दिल्या होत्या. याशिवाय केंद्र सरकारच्या भारतीय पुरातत्त्व विभागाने आपल्या पातळीवर कबरीची सुरक्षा वाढवत या भोवती उंच असे पत्र्याचे शेड आणि त्यावर तारांचे कुंपण लावण्याची तयारी सुरू केली आहे. याशिवाय कबर सर्वसामान्य पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे.

कबरीजवळ चीटपाखरूही जाणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. या संपूर्ण तयारीचा फोटो विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी 'एक्स'वर पोस्ट करत केंद्र व राज्य सरकारला खडेबोल सुनावले आहे. छत्रपतींचा आशीर्वाद अशी काही घोषणा देत सत्तेत आलेल्या सत्ताधाऱ्यांनी शंभुराजेंच्या मारेकऱ्याभोवती जणू किल्लाच उभा केला आहे. या उपर तीन फुटी तार येणार आहे, आता फक्त लष्कर लावायचं बाकी राहिलं आहे, अशा शब्दात केंद्र आणि राज्य सरकारला त्यांनी सुनावले.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT