Ayodhya Ram Temple Ceremony : श्रीराम जन्मभूमी असलेल्या अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना सोहळा मोठ्या थाटामाटात होणार आहे. भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि अनेक हिंदुत्वादी संघटनांनी तसेच भाजपशी युती असलेल्या राजकीय पक्षांनीही या सोहळ्यासाठी जोरदार तयारी केली आहे.
देशभरातून व्हीव्हीआयपी मंडळी या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. मात्र या ऐतिहासिक सोहळ्यात चारही शंकराचार्य सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापैकी दोन शंकराचार्यांनी सोहळ्याला थेट विरोध दर्शवला आहे.
यावरून काँग्रेस नेते सचिन सावंत(Sachin Sawant) यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. 'हिंदू धर्मात काय योग्य काय अयोग्य हे सांगण्यासाठी भाजपा आणि मोदी शंकराचार्यांपेक्षा मोठे का? अपूर्ण बांधकाम झालेल्या मंदिरात प्रतिष्ठापना करणे योग्य नाही, असे स्पष्ट मत चारही पिठाच्या शंकराचार्यांनी व्यक्त केले आहे. भाजपला रामाबद्दल आस्था नाही पण निवडणुकीत रामाच्या नावाचा वापर करावयाचा आहे. भाजपा संघाचे ढोंगी हिंदू प्रेम उघड झाले आहे. असं सावंत यांनी म्हटलं आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तर दुसरीकडे काँग्रेस हायकमांडनेही या सोहळ्यास उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोहळ्याला राजकीय रंग दिल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. यावरून भाजपने काँग्रेसला हिंदुद्वेषी म्हणत टीका सुरू केली आहे.
काँग्रेसच्या(Congress) निर्णयाला शंकराचार्यांच्या भूमिकेमुळे बळ मिळाल्याचे मानले जात आहे. स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती आणि स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी हा सोहळा हिंदू धर्मातील शास्त्र, विधींनुसार होत नसून त्याचे उल्लंघन करणारा असल्याचा आक्षेप घेतला आहे. शास्त्रोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठापना न केल्यास त्यात भूत-पिशाच्च वास करतात, असे निश्चलानंद सरस्वती यांनी म्हटले आहे, तर अपूर्ण मंदिरात प्राणप्रतिष्ठापना करणे शास्त्रविरोधी असल्याची भूमिका स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी मांडली आहे.
तर राम मंदिर आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेले भाजप नेते लालकृष्ण अडवाणींनी( Lal Krishna Advani) आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. अयोध्येत राम मंदिर बांधणार हे नियतीने आधीच ठरवले होते. सध्या फक्त माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कमी जाणवत असल्याचे अडवाणी म्हणाले.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.