Rajesh Tope,Babanrao Lonikar  sarkarnama
महाराष्ट्र

Babanrao Lonikar Rajesh Tope audio clip : एका आमदाराची दुसऱ्या आमदाराला शिवीगाळ

सरकारनामा ब्यूरो

Babanrao Lonikar Rajesh Tope News : जालना जिल्हा मध्यवर्ती निवडणुकीत सहकार्य न केल्याच्या कारणातून माजी मंत्री, आमदारा बबनराव लोणीकर आणि माजी मंत्री, आमदार राजेश टोपे यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. दोन्ही माजी मंत्र्यांच्या समर्थनांकडून एकमेकांवर हल्ले करत गु्न्हे दाखल केले होते. मात्र,आता यातील एका आमदार दुसऱ्या आमदाराने अर्वाच्य भाषेत शिविगाळ करत असल्याचा तथाकथित ऑडिओ व्हायरल झाला आहे.

जालना जिल्ह्यातील लोणीकर आणि टोपे हे दोन्ही माजी मंत्री आहेत. त्यांच्या व्हायरल झालेल्या तथाकथित व्हायरल ऑडिओ क्लीपमध्ये एक आमदार दुसऱ्या आमदाराला अर्वाच्च भाषेत शिविगाळ करताना पाहायला मिळते आहे. जालना जिल्ह्याच्या मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत टोपे यांनी लोणीकर यांना सहकार्य करत बबनराव लोणीकर यांचा मुलगा राहुल लोणीकर याला सहकार्य करत उपाध्यक्ष करण्याचे मान्य केल्याचा दावा करण्यात येतो आहे. मात्र, टोपे यांनी आपला शब्द पाळला नाही. यावर या ऑडिओत दोघा आमदारांमध्ये वाद झाल्याचे ऐकायला मिळते आहे.

आमची तीन पक्षांची बैठक झाली होती. त्यामध्ये काही वाद झाले होते. मात्र, ही क्लीप मी ऐकली नाही.ती खोटी आहे. बनावट आहे, असे बबनराव लोणीकर यांनी ठासून सांगितले. तर, जालना जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष पदावरून झालेल्या वादातून या दोन्ही आमदारांचा वाद असल्याचे बोलले जात आहे. बबनराव लोणीकर यांचा मुलगा राहुल लोणीकर याना उपाध्यक्ष करण्यावरून हा वाद पाहायला मिळतोय. मात्र, राजकीय वर्तुळात या ऑडीओ क्लिपची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत राजेश टोपे यांचे चुलत बंधू हे अध्यक्ष झाले. मात्र, बबनराव लोणीकर यांच्या मुलला सहकार्य न करता रावसाहेब दानवे गटाला राजेश टोपे यांच्याकडून सहकार्य करण्यात आले. त्यामुळे राहुल लोणीकर यांचे उपाध्यक्ष पद हुकले. त्यामुळे राजेश टोपे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली होती.शिवाय टोपे यांच्या गाडीवर दगडफेक झाल्यानंतर अज्ञांनी बबनराव लोणीकर यांच्या घरावर दगडफेक केली होती. विशेष म्हणजे याचवेळी लोणीकर यांच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या राजेश टोपे यांच्या बंधूच्या घरावर देखील यावेळी दगडफेक करण्यात आली होती.

ऑडिओमध्ये वापरण्यात आलेल्या अर्वाच्य भाषेमुळे हा वाद खुपच विकोपाला गेल्याचे पाहण्यास मिळत आहे. मात्र, या तथाकथिक ऑडिओची पुष्टी करण्यात आलेली नाही. बबनराव लोणीकरांनी तर आमच्या वाद आहेत.जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ठरल्याप्रमाणे काही झाले नाही. मात्र, ही ऑडिओ क्लीप बनावट असल्याचे सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT