Bacchu Kadu News: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांकडून EVM वर संशय व्यक्त केला जात होता. माळशिरस मतदारसंघातून विजयी होऊनही उत्तम जानकर यांनीही EVM वर संशय व्यक्त केला. मारकडवाडी गावातील नागरिकांकडून गावात पुन्हा बॅलेटपेपर निवडणूक घेण्याची तयारी करण्यात आली. तेव्हा प्रशासनाने गावात कलम 144 लावले.
आता अचलपूर मतदारसंघातून पराभूत झालेल उमेदवार, प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी देखील EVM वर पुन्हा संशय व्यक्त करत कोर्टही बदमाश पण ती आम्ही कोर्टात जाऊ, असे म्हटले आहे.
बच्चू कडू म्हणाले, ब्राह्मणवाडा थडी येथील मतदान केंद्रावर मला यंदाच्या निवडणुकीत केवळ 60 मतं मिळाली आहेत. विशेष म्हणजे त्या गावातील 125 लोकांनी मला स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्रावर लिहून दिलं आहे, ज्यामध्ये आम्ही तुम्हालाच मतदान केल्याचं ते सांगत. गेल्या निवडणुकीच्या वेळी या मतदान केंद्रावर मला 148 मतं मिळाली होती.या प्रकरणात आम्ही आता कोर्टात जाऊ.
सामान्य मतदाराला त्याचे मत कुठे गेले हे जाणण्याचा अधिकारी आहे. त्यासाठी आम्ही आता कोर्टात जाणार आहोत. कोर्ट आम्हाला न्याय देईल असे वाटत नाही. तरी आम्ही कोर्टात जाऊ, असे देखील बच्चू कडू म्हणाले.
महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांकडून आपल्या पराभवाला ईव्हीएमला जबाबदार धरले जात आहे. काँग्रेसने ईव्हीएमच्या विरोधात रॅली काढणार असल्याचे देखील जाहीर केले होते. त्यामुळे हा EVM विरोधातील मुद्दा बच्चू कडू यांच्या विधानानंतर आणखी तापणार असल्याची चिन्ह आहेत.
उत्तम जानकर यांनी दावा केला होता की, EVM घोटाळा केला आहे त्यामुळे ते सत्तेत आहेत. खरे पाहिले तर अजित पवार यांचे 12, शिंदेंचे 18 तर भाजपचे 77 आमदार निवडून येणार होते. असे सगळे मिळून 107 आमदार आहेत आणि दोन ते तीन अपक्ष आहेत, असे देखील जानकर म्हणाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.