महाराष्ट्र

Bachchu Kadu News : बच्चू कडूंचा पंतप्रधान मोदींवर प्रहार; 'नकली संतान' म्हणणे खालच्या स्तराची भाषा...

Chetan Zadpe

Maharashtra News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना ठाकरे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या नकली सेना आणि बाळासाहेबांची नकली संतान अशी जाहीर प्रचारसभेतून टीका करण्यात आली होती. यावर ठाकरेंकडून प्रत्यु्त्तर देताना मोदींना बेअकली माणसा, असा पलटवार करण्यात आला. प्रचाराच्या या खालावलेल्या भाषेवर आता आमदार बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे."कुणालाही नकलीसंतान म्हणणे योग्य नाहीत म्हणत कडूंनी पंतप्रधान मोदींवर टीकेचा प्रहार केला आहे. (Latest Marathi News)

एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलताना बच्चू कडू म्हणाले, "मला वाटतं एवढ्या मोठ्या नेत्यांनी अशा प्रकारची भाषा वापरु नये. कुणीही असो अशी व्यक्तिगत टीका कुणीही कुणावर करु नये. नकली पक्षांपर्यंत टीक आहे. पण नकली संतान अशी विधानं मोदी करतील असं वाटत नाही, पण बोलले असतील तर ते अत्यंत चुकीचं आहे. खालच्या स्तरावर हा प्रचार जाईलच. दुर्देव आहे, ग्रामपंचायतीत अशा प्रकारची भाषा वापरली गेली नाही."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोदी नेमके काय म्हणाले?

मी जरा नकली शिवसेनेच्या (Shiv Sena) बाळासाहेब ठाकरेंच्या संतानांना विचारायचं आहे. जरा बाळासाहेबांचं स्मरण करा. मी नकली संतानांना विचारु इच्छितो. मी त्यांचे मार्गदर्शक बुजुर्ग नेत्यांनाही विचारु इच्छितो. यांनी म्हंटलं की, पश्चिम भारचाचे लोक अरब राष्ट्रांचे वाटतात. महाराष्ट्राच्या लोकांना ही भाषा मान्य आहे का? असा सवाल पंतप्रधान मोदींनी विचारला.

ठाकरेंचं प्रत्युत्तर -

पंतप्रधान मोदी 17 तारखेला मुंबईत येत आहेत. शिवाजी पार्कला येतील. बाळासाहेबांच्या स्मारकावरती जातील. नाक रगडतील. मंचावर बाळासाहेबांची आठवण काढून ढसाढसा रडतील. ही नकली आणि बेअकली माणसं आहेत. मी उघड बोलतो. कारण मला जर नकली संतान म्हणत असाल, तर तुम्हीसुद्धा नकली आणि बेअकली आहात, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT