Bachchu Kadu Nagpur protest for farmers Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Farmer Protest: मोठी बातमी: कर्जमाफीची लढाई जिंकल्यानंतरही बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी पुन्हा आंदोलन उभारणार, काय आहे कारण?

Farmer Loan Waiver: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील लाखो शेतकर्‍यांचं लक्ष लागलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News: विधान परिषदेचे आमदार व शिवसेना नेते बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मोठं आंदोलन उभारलं होतं.या आंदोलनानं त्यावेळी सरकारला त्यांनी घाम फोडला होता. तसेच सरकारने त्यांच्या आंदोलनाची दखल घेत योग्यवेळी कर्जमाफी दिली जाईल, असा शब्द दिला होता. अखेर बच्चू कडूंच्या लढ्याला मोठं यश आलं आहे.

राज्यातील महायुती सरकारनं मंगळवारी (ता.2 जून) मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जमाफीविषयी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यानंतरही विधानपरिषदेचे शिवसेनेचे आमदार बच्चू कडू हे आक्रमक झाले आहे. एकीकडे त्यांनी कर्जमाफीच्या मंजुरीनंतर सरकारचं अभिनंदन करतानाच पुन्हा एकदा शेतकर्‍यांसाठी नवं आंदोलन उभारण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील लाखो शेतकर्‍यांचं लक्ष लागलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

मात्र, विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यानं पण कॅबिनेटच्या बैठकीत कर्जमाफीला मंजुरी दिल्यानंतरही सरकारकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. कदाचित आचारसंहिता संपल्यानंतर सरकारकडून अधिकृतपणे कर्जमाफीची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. पण याचदरम्यान, एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मंजुरीनंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची जो निर्णय झाला आहे त्याचं स्वागत करतो आणि सरकारचे आभार मानतो. मुख्यमंत्री देवाभाऊ,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो.

तसेच त्यावेळी आमच्या शेतकरी कर्जमाफीच्या आंदोलनात सहभागी असलेले राजू शेट्टी, वामनराव चटप,डॉक्टर अजित नवले, महादेवराव जानकर,रविकांत तुपकर यांचेही आभार मानतो. कर्जमाफीची लढाई जिंकली, मात्र आता प्रोत्साहन पर एक लाख रुपये करावे यासाठी माझी लढाई सुरू राहणार असल्याचं कडू यांनी सांगत नव्या आंदोलनाचे संकेत तर दिले नाहीत ना अशी चर्चा सुरू झाली आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये मोठे आंदोलन करण्यात आले होते. वाहतूक कोंडीमुळे यावेळी नागपूरकरांसह महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी अडचण झाली होती. त्यानंतर सरकारच्याकडून बच्चू कडू यांना मुंबईत चर्चेसाठी निमंत्रित करण्यात आले. या बैठकीत 30 जूनच्या आत कर्जमाफी देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता.

त्यावेळी सरकार तारीख जाहीर करत नव्हते.पळ काढत होते.मात्र, शेतकऱ्यांच्या रेट्यामुळे सरकारला कर्जमाफीची तारीख जाहीर करावी लागली असा दावा बच्चू कडू यांनी केला होता. तसेच त्यांनी सरकारने कर्जमाफीची तारीख चुकवली तर त्यांना सळो की पळो करून सोडू,जिथे उभे राहील तिथे झोडून काढू, असा इशाराही त्यांनी दिला होता, असा इशाराही कडू यांनी दिला होता.

56 लाख शेतकऱ्यांना लाभ

राज्य सरकारचा सहकार विभाग शेतकरी कर्जमाफीबाबतच्या अटी व शर्ती संदर्भात परिपत्रक काढणार असल्याची माहिती समोर येत आहे. सरकारच्या शेतकरी कर्जमाफीसाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली असून सुमारे 65 लाखांहून अधिक कर्जखात्यांना 36,585 कोटी रुपये एवढी मोठी आर्थिक तरतूद असणार आहे.या निर्णयाचा थेट 56 लाख शेतकऱ्यांना लाभ होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT