Mumbai News : महाराष्ट्र निवडणुकीच्या निकालाबाबत सगळे सर्व्हेंचे अंदाज चुकवत आणि राजकीय नेत्यांसाठी अनपेक्षित व तेवढाच धक्कादायक असा निकाल समोर आला. त्यात दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर नवख्या उमेदवारांनी आमदारकी मिळवली. असाच एक धक्कादायक निकाल अचलपूर विधानसभा मतदारसंघात लागला. (Bjp News)
विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव झाला. त्यापैकीच एक म्हणजे प्रहारचे नेते बच्चू कडू. अचलपूर विधानसभा मतदारसंघातून बच्चू कडू यांचा पराभव झाला. पराभवानंतर बच्चू कडू राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा बुलढाण्याच्या शेगावमध्ये मेळावा घेणार आहेत. सत्ता की सत्तेच्या बाहेर, झेंडा की सेवा याचा निर्णय बच्चू कडू घेणार आहेत. त्याआधीच बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या नावाला विरोध केला जात आहे. भाजपच्या (Bjp) वरिष्ठ नेत्याने बच्चू कडू यांना महायुतीत घेऊ नये, अशी भूमिका मांडली आहे.
बच्चू कडूंना महायुतीत घेऊ नका
राज्याचे माजी महसूलमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बच्चू कडू यांच्या नावाला विरोध केला आहे. बच्चू कडू यांना महायुती सरकारने पाठबळ दिले. धोरण मान्य केली. दिव्यांगाची धोरण मान्य केली. त्याच्याशी प्रतारणा करून बच्चू कडू यांनी जो विश्वासघात दाखवला. त्यामुळे त्यांना महायुतीमध्ये सामिल करून घेण्याची आवश्यकता नाही. त्यांना घेऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे, विखे पाटील म्हणालेत. मुंबईत पक्षश्रेष्ठींच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखे पाटील मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. ग्रामदैवत म्हसोबा महाराजांच्या यात्रेच्या नियोजनासाठी ग्रामस्थांसोबत बैठक घेतली. तेव्हा ते माध्यमांशी बोलत होते.
मुख्यमंत्रिपदाबाबत काय म्हणाले?
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबतचा पेच कायम आहे. एकनाथ शिंदे यांनी जरी मोदी-शाह यांचा निर्णय मान्य असल्याचे म्हटलं असलं. तरी महायुतीकडून नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. यावरही राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांनी हे रान उठवलय की एकनाथ शिंदे नाराज आहेत म्हणून. ते नाराज असण्याचं काही कारण वाटत नाही. पक्ष नेतृत्व जो निर्णय देईल तो मी मान्य करील, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. आमची पहिली पसंती ही देवेंद्र फडणविस यांनाच आहे, असं विखेंनी म्हटलं आहे.
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात कोणत्या खात्याची अपेक्षा आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा मंत्रिपदाबाबत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार देवेंद्र फडणवीस यांना आहेत. त्यामुळे वेगळं मागण्याचं कारण नाही. पक्ष नेतृत्वाचा जो माझ्याबद्दल विश्वास आहे. निश्चितपणे ते चांगली जबाबदारी मला देतील, त्याबद्दल माझ्या मनात शंका नाही, असे विखे पाटील म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.