Assembly Election: राजकीय पार्श्वभूमीचे 89 जण आमदार; 'घराणेशाही नको' म्हणणारा भाजपच विधानसभेत नंबर वन, राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर

Political News : राज्यातील विधानसभा निवडणुकीत 288 मतदारसंघांपैकी 237 मतदारसंघात घराणेशाहीतून पुढे आलेले उमेदवार उभे असल्याचे पुढे आले आहे. त्यामध्ये सर्वच राजकीय पक्षात कमी अधिक प्रमाणात घराणेशाहीचे चित्र दिसत आहे.
Assembly Election News
Assembly Election Newssarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमत मिळवत महाविकास आघाडीचा मोठ्या फरकाने सुफडासाफ केला. हा निवडणुकीचा निकाल महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का आहे. दुसरीकडे बहुमत असल्याने लवकरच राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. त्यासाठीच्या घडामोडीना वेग आला आहे. त्यातच राज्यातील विधानसभा निवडणुकीत 288 मतदारसंघांपैकी 237 मतदारसंघात घराणेशाहीतून पुढे आलेले उमेदवार उभे असल्याचे पुढे आले आहे. त्यामध्ये सर्वच राजकीय पक्षात कमी अधिक प्रमाणात घराणेशाहीचे चित्र दिसत आहे. (Assembly Election News )

राज्याच्या राजकारणात सध्या महायुतीमधील तीन घटक पक्ष तर महाविकास आघाडीतील तीन घटक पक्ष असे सहा पक्ष सध्या अस्तित्वात आहेत. या सहा पक्षामध्ये विधानसभा निवडणुकीत मोठी चुरस पहावयास मिळाली. राज्यातील 288 मतदारसंघांपैकी, 237 मतदारसंघात घराणेशाहीतून पुढे आलेले उमेदवार नशीब अजमावत होते. त्यामध्ये, सर्वाधिक उमेदवार हे भाजपने (BJP) दिले होते. पण, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) आकडेवारी एकत्र केल्यास घराणेशाहीतील सर्वाधिक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसने उभे केल्याचे दिसून आले.

Assembly Election News
Shivsena UBT News : उद्धव ठाकरेंचा पक्ष मराठवाड्याच्या राजधानीतून गायब, याला जबाबदार कोण ?

राज्यातील विधानसभेच्या रिंगणात घराणेशाहीची पार्श्वभूमीवर असलेले उमेदवार येथील निवडणुकीसाठी उभे होते. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा राज्यातील 288 मतदारासंघांपैकी जवळपास 237 मतदारसंघात घराणेशाहीचा बोलबाला होता. मात्र, या 237 उमेदवारांपैकी केवल 89 उमेदवारांनाच जनतेने निवडून दिले आहे.

Assembly Election News
Shivsena Politics: शिवसैनिक संतापले...निवडणूक प्रचारात काँग्रेस पक्ष होता तरी कुठे?

राज्याचे राजकारण पवार, ठाकरे, थोरात, देशमुख, मुंडे, शिंदे, फडणवीस या बड्या नेत्यांच्या अवतीभवतीच फिरते. त्यामुळे राजकीय वारसा किंवा त्यांचा वारसा पुढे नेणारे कुटुंबातील सदस्य निवडणूक रिंगणात उतरलेले दिसतात. बारामतीमधील पवार कुटुंबात मोठा राजकीय वारसा असून तीन पिढ्यांपासून त्यांची घराणेशाही दिसून येते. त्याचप्रमाणे ठाकरे, मुंडे, देशमुख यांच्यासह राज्यातील बहुतांश मतदारसंघात घराणेशाहीचे चित्र पहावयास मिळते, दुसरीकडे निवडणुका म्हटल्या की घराणेशाही हा विषय नेहमीच समोर येतो.

Assembly Election News
Latur BJP News : लातूर जिल्ह्यात मंत्रिपदासाठी मोठी स्पर्धा; निलंगेकर, पवार अन् कराडही रांगेत..

सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय अभ्यासक हेरंब कुलकर्णी यांनी याबाबतचा एक अहवाल समोर आणला आहे. त्यांच्या घराणेशाही बाबतच्या अहवालानुसार हेरंब कुलकर्णी यांनी याबाबतीत कायदेशीर नियमावली करण्याची मागणी सुद्धा केली होती. हेरंब कुलकर्णी यांच्या अहवालानुसार, घराणेशाहीतील 237 उमेदवारांपैकी 89 उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपने तिकीट दिलेल्या उमेदवारांपैकी 32 टक्के उमेदवार हे घराणेशाहीशी निगडीत आहेत.

विधानसभा निवडणुकीत घराणेशाहीचे उमेदवार पक्षनिहाय पुढील प्रमाणे : भाजप- 49, राष्ट्रवादी काँग्रेस - 26, शिवसेना एकनाथ शिंदे गट - 19, काँग्रेस - 42, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष - 39, शिवसेना उद्धव ठाकरे गट -19, इतर - 43 जण निवडणूक रिंगणात होते.

Assembly Election News
BJP Politics : भाजपचं पुन्हा धक्कातंत्र; अमित शाह आणि तावडेंच्या भेटीमुळे मुख्यमंत्रि‍पदाचा सस्पेन्स वाढला, नेमकी चर्चा काय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com