Bapusaheb Pathare sarkarnama
महाराष्ट्र

Bapusaheb Pathare Won : पोर्श कार प्रकरण भोवलं! सुनील टिंगरेंचा पराभव, बापू पठारे विजय

Bapusaheb Pathare won Vadgaon Sheri Assembly Election 2024: चुरशीच्या लढतीत वडगाव शेरी मतदारसंघातून अखेर बापूसाहेब पठारे चार हजार 122 मतांनी विजयी

Roshan More

Vadgaon Sheri Assembly 2024 Result : पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात एक उलट फेर पाहिला मिळाला आहे या ठिकाणी विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना पराभवाचा धक्का बसला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बापू पठारे हे विजयी झाले आहेत.

शहरातील सर्वच्या सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये एकीकडे महायुतीचा बोलबाला सुरू असताना दुसरीकडे मात्र वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला. सुरुवातीपासूनच सुनील टिंगरे यांनी आघाडी घेतली होती मात्र शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये बापू पठारे यांनी जोरदार मुसंडी मारत सुनील टिंगरे यांचा चार हजार 122 मतांनी पराभव केला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल Latest Update

वडगाव शेरी मतदारसंघ सुरुवातीपासूनच चर्चेत राहिला पोर्श अपघात प्रकरणांमध्ये सुनील टिंगरे यांनी आरोपीला मदत केल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून होत होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात सभा घेत पोर्श अपघात प्रकरणावरून सुनील टिंगरेंवर जोरदार हल्ला चढवला होता. हे पोर्श प्रकरण सुनील टिंगरे यांच्या पराभवाला कारणीभूत ठरले असल्याची चर्चा मतदारसंघात आहे.

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ हा भाजपाला सोडावा, यासाठी सुरुवातीपासूनच भाजपचे नेते आग्रही होते. या विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार जगदीश मुळीक यांना उमेदवारी मिळावी यासाठी भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून देखील प्रयत्न करण्यात आला. मात्र शेवटपर्यंत अजित पवारांकडून सुनील टिंगरे यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी आग्रह धरण्यात आला. शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असलेल्या रस्सीखेच मध्ये अखेरच्याक्षणी देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून जगदीश मुळीक यांना अर्ज भरण्यास थांबवले.

महाराष्ट्रातील निकालाची प्रत्येक घडामोड - येथे क्लिक करा...

त्यानंतर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना प्रचारात देखील सहभागी होण्याचे सूचना देण्यात आल्या होत्या. असे असताना देखील सुनील टिंगरे यांचा पराभव झाल्याने भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुनील टिंगरे यांचा प्रचार केला का असा प्रश्न चर्चिला जात आहे.

विसाव्या फेरीमध्ये सुनील टिंगरे हे 786 मतांनी आघाडीवर होते मात्र शेवटच्या तीन फेऱ्यांमध्ये बापू पठारे यांनी आघाडी घेत विजय मिळवला. चुरशीच्या लढतीत वडगाव शेरी मतदारसंघातून अखेर बापूसाहेब पठारे चार हजार 122 मतांनी विजयी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT