Maharashtra Vidhansabha Election Result Update: पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचा दबदबा पाहायला मिळत आहे. सर्वच्या सर्व ठिकाणी महायुतीचे उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र पहिला मिळत असल्याने पुण्यामध्ये महायुती शतप्रतिशत विजय मिळवेल अशा चर्चा रंगल्या आहेत.
जागा वाटपामध्ये पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी महायुतीमध्ये सहा विधानसभा मतदारसंघ हे भाजपाकडे तर दोन विधानसभा मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आल्याचे पाहायला मिळालं. शिंदे यांच्या शिवसेनेला (Shivsena) पुणे शहरातील एकही जागा मिळू शकली नव्हती.
खडकवासला, कसबा, शिवाजीनगर, पर्वती कोथरूड आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपने आपले उमेदवार दिले होते. तर हडपसर आणि वडगाव शेरी या विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते.
भाजपने (BJP) कोथरूड, पर्वती,खडकवासला शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट या विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदारनाच पुन्हा संधी दिल्याचं पाहायला मिळालं. तर अजित पवारांनी देखील आपल्या दोन विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली होती.
चित्र पाहिलं तर चंद्रकांत पाटील यांनी तब्बल पन्नास हजारांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात काटे की टक्कर होईल असं बोललं जात होतं मात्र दहाव्या फेरी अखेर भाजपचे उमेदवार सुनील कांबळे यांनी 5876 मतांची आघाडी घेतली आहे.
खडकवासला विधानसभा मतदारसंघात सुरुवातीला भाजप उमेदवार भीमराव तापकीर हे पिछाडी वरती राहिले असले तरी दहाव्या फेरी अखेर 15515 मतांची आघाडी त्यांनी मिळवली आहे. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात देखील दहाव्या फेरी भाजप उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांना 17315 मतांची आघाडी मिळाली आहे.
विधानसभा मतदारसंघात देखील भाजपा उमेदवार माधुरी मिसाळ यांनी एकतीस हजारांची आघाडी घेतल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. या ठिकाणी आबा बागुल यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवल्याने तिहेरी लढत पाहायला मिळाली.मात्र सध्या तरी विरोधातील उमेदवार आपला प्रभाव टाकण्यात कमी पडले असल्याचे चित्र आहे.
निवडणुकीमध्ये पराभव स्वीकारावा लागल्यानंतर कसब्यामध्ये यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या हेमंत रासने यांनी तब्बल 12 हजारांचे लीड घेतला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) उमेदवार हडपसर आणि वडगाव शेरीतून आघाडी वरती आहेत वडगाव शेरी येथून सुनील टिंगरे यांना 11340 मतांचं लीड मिळालेला असून हडपसर विधानसभा मतदारसंघातून चेतन तुपे 22726 मतांनी आघाडी वरती आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.